IPL 2021: पुन्हा ती चूक करणं धोनीला पडेल महागात; होऊ शकते एका सामन्यासाठी बंदीची कारवाई

IPL 2021: पुन्हा ती चूक करणं धोनीला पडेल महागात; होऊ शकते एका सामन्यासाठी बंदीची कारवाई

IPL 2021: एमएस धोनीनं (MS Dhoni) दिल्ली विरुद्धच्या सामन्यात मंद गतीनं ओव्हर टाकल्या आहेत. त्यामुळे त्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल: एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्जने (CSK) आयपीएलच्या या मोसमातील (IPL 2021) पहिला विजय साकारला आहे. चेन्नईने पंजाब किंग्जचा (CSK vs PBKS)  6 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने चेन्नईसमोर 107 रनांचं लक्ष्य ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईनं 15.4 ओव्हरमध्ये चार गड्यांच्या बदल्यात लक्ष्य पूर्ण केलं आहे. चेन्नईचा पहिल्या सामन्यात दिल्लीकडून पराभव झाला होता. पंजाबविरुद्धच्या सामन्यात धोनीला भलंही बॅटींगची संधी मिळाली नाही. पण या सामन्यात त्याने कप्तानीमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.

धोनीने पंजाब विरुद्धच्या सामन्यात निर्धारित वेळेपूर्वीच 20 ओव्हर पूर्ण केल्या आहेत. तर दिल्लीविरूद्धच्या सामन्यात मंद गतीनं ओव्हर टाकल्यानं त्याला चांगला दंडही सहन करावा लागला आहे. गेल्या सामन्यात धोनीला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. वास्तविक, बीसीसीआयने असा नियम बनवला आहे, ज्यामुळे प्रत्येक संघाला 90 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणं अपेक्षित आहे.

पूर्वी हा नियम होता

यापूर्वी 90 व्या मिनिटाला 20 वी ओव्हर सुरू करावी असा नियम होता, परंतु आता निर्धारित दीड तासाच्या आत 20 ओव्हर पूर्ण करावं लागणार आहे. शिवाय या 90 मिनिटांत संघाला अडीच मिनिटांचा दोनदा टाइम आऊटही मिळणार आहे. म्हणजेच प्रत्येक संघांला 85 मिनिटांत एकूण 20 ओव्हर टाकणं अपेक्षित आहे. त्यानुसार प्रत्येक संघाला एका तासामध्ये 14.1 ओव्हर  टाकावी लागतील. जर धोनीनं अशी चूक पुन्हा केली, तर त्याच्यावर बंदीचं सावट असणार आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार, पहिल्यांदा नियमांचं उल्लंघन केल्यास 12 लाख रुपयांचा दंड आणि पुढील दोन सामन्यांमध्ये पुन्हा तीच चूक केली तर कर्णधाराला कडक शिक्षेचा सामना करावा लागू शकतो.

(हे वाचा-IPL 2021 : पहिले रन आऊट मग कॅच, सुपरमॅन जडेजाची अफलातून फिल्डिंग, पाहा VIDEO)

पहिल्यांदा ही चूक झाली तर कॅप्टनला 12 लाखांचा दंड, दुसऱ्यांदा चूक झाली तर कॅप्टनला 24 लाखांचा दंड तिसऱ्या चुकीसाठी कॅप्टनवर एका मॅचची बंदी असा नियम आहे. तर दुसऱ्यांदा या चुकीनंतर टीममधील खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा मॅच फिसमधील 25 टक्के रक्कम (यापैकी जे कमी असेल ते) दंड, तिसऱ्या चुकीनंतर टीममधील खेळाडूंना 12 लाख रुपये किंवा मॅच फिसमधील 50 टक्के रक्कम (यापैकी जी रक्कम कमी असेल ती) दंड म्हणून द्यावी लागेल.

(हे वाचा-IPL 2021 : धोनी रिव्ह्यू सिस्टीम, थर्ड अंपायरकडेही जायची गरज नाही!)

पंजाब विरुद्ध चेन्नईच्या सामन्यात प्रथम बॉलींग करताना चेन्नईनं पंजाबला कमी धावांत रोखलं आहे. तर बॅटींग करतना फाफ डु प्लेसीस आणि मोईन अलीच्या चिवट बॅटींगच्या मदतीनं सीएसकेनं सहज लक्ष्य गाठलं आहे. चेन्नईकडून शानदार बॉलिंग करताना चहरने 13 धावांच्या बदल्यात चार गडी टीपले आहेत. तर डु प्लेसीसने 36 आणि अलीने नाबाद 46 धावा केल्या आहेत.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 8:40 AM IST

ताज्या बातम्या