मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : हर्षल पटेलचा 'अतिउत्साह' पडला महागात, विराटला झाली दुखापत

IPL 2021 : हर्षल पटेलचा 'अतिउत्साह' पडला महागात, विराटला झाली दुखापत

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेल (Harshal Patel) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेल (Harshal Patel) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेल (Harshal Patel) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

दुबई, 30 सप्टेंबर : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेल (Harshal Patel) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या मोसमात हर्षल पटेलने आतापर्यंत तब्बल 26 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या एका मोसमात एवढ्या विकेट घेण्याच्या भुवनेश्वर कुमारच्या (Bhuvneshwar Kumar) रेकॉर्डशी हर्षल पटेलने बरोबरी केली आहे. मुंबईविरुद्धच्या (RCB vs MI) सामन्यात हर्षल पटेलने हॅट्रिक घेतली, पण यानंतर हर्षल पटेलने केलेल्या सेलिब्रेशनमुळे विराट कोहली (Virat Kohli) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) दुखापतग्रस्त झाले. हर्षल पटेलने या दोघांना झालेल्या दुखापतीबाबत आता प्रतिक्रिया दिली आहे.

'मोहम्मद सिराजचा पाय ठीक आहे. सेलिब्रेशनदरम्यान विराटच्या जांघेमध्ये दुखापत झाली. सेलिब्रेशननंतर मी लगेच सिराजच्या पायाला झालेल्या दुखापतीची माहिती घेतली. विराटच्या जांघेलाही जखम झाली,' असं हर्षल पटेल म्हणाला. iplt20.com वर हर्षल पटेलचा एक व्हिडिओ टाकण्यात आला आहे.

'प्रत्येक वातावरणात ढळून घेणं खेळाचा महत्त्वाचा भाग आहे. मी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या वातावरणात चांगल्या पद्धतीने ढळून जातो. याचा मला अभिमान आहे. इथलं मैदान मोठं आहे आणि खेळपट्टीही संथ आहे. माझ्या बॉलिंगसाठी ही परिस्थिती अनुकूल आहे,' असं वक्तव्य हर्षल पटेलने केलं.

हर्षलचा विक्रम

बुधवारी राजस्थानविरुद्धच्या (RCB vs RR) सामन्यात हर्षल पटेलने 3 विकेट घेतल्या. या मोसमात हर्षल पटेलने आतापर्यंत 26 विकेट घेतल्या आहेत. आयपीएल इतिहासात आरसीबीकडून एखाद्या बॉलरची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. याआधी लेग स्पिनर युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 2015 साली आरसीबीकडून खेळताना 23 विकेट घेतल्या होत्या. या मोसमात त्याने 11 सामन्यांमध्ये 13 च्या सरासरीने 26 विकेट घेतल्या. तसंच त्याचा स्ट्राईक रेटही 9 चा आहे. म्हणजेच प्रत्येक 9 व्या बॉलवर तो विकेट घेत आहे. याचसह त्याने एकदा 4 विकेट आणि एकदा 5 विकेट घेण्याचा कारनामाही केला आहे.

ब्राव्होचं रेकॉर्ड निशाण्यावर

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 32 विकेट घेण्याचा विक्रम चेन्नईच्या (CSK) ड्वॅन ब्राव्होच्या (Dwayne Bravo) नावावर आहे. 2013 साली ब्राव्होने हा विक्रम केला होता. दिल्लीच्या कागिसो रबाडाने 2020 साली 30 विकेट घेतल्या होत्या. मुंबईच्या लसिथ मलिंगाने 2011 साली 28 विकेट मिळवल्या होत्या. तर 2017 साली भुवनेश्वर कुमारला 26 विकेट घेता आल्या. 2015 साली पुन्हा ब्राव्होनेच 26 विकेट घेतल्या होत्या. 2019 साली इम्रान ताहिरनेही 26 विकेट मिळवल्या होत्या.

First published:

Tags: IPL 2021, RCB, Virat kohli