• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 सुरू होण्याआधीच ही टीम OUT ! प्ले-ऑफला पोहोचणंही अशक्य

IPL 2021 सुरू होण्याआधीच ही टीम OUT ! प्ले-ऑफला पोहोचणंही अशक्य

IPL सुरू होण्याआधीच टीमला बसला मोठा धक्का

IPL सुरू होण्याआधीच टीमला बसला मोठा धक्का

आयपीएल 2021 (IPL 2021) चं दुसरं सत्र सुरू व्हायला एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) टीमला आणखी एक धक्का लागला आहे. राजस्थान रॉयल्सचा महत्त्वाचा खेळाडू जॉस बटलर (Jos Butller) आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांमध्ये खेळणार नाही.

 • Share this:
  मुंबई, 21 ऑगस्ट : आयपीएल 2021 (IPL 2021) चं दुसरं सत्र सुरू व्हायला एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलच्या उरलेल्या मोसमाला सुरुवात होईल, तर 15 ऑक्टोबरला फायनल खेळवली जाईल. कोरोना व्हायरसमुळे 29 मॅचनंतर आयपीएल मे महिन्यात स्थगित करण्यात आली होती. आता उरलेले 31 सामने युएईमध्ये खेळवले जातील. आयपीएल सुरू व्हायला एक महिना शिल्लक असतानाच राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan Royals) टीमला आणखी एक धक्का लागला आहे. राजस्थान रॉयल्सचा महत्त्वाचा खेळाडू जॉस बटलर (Jos Butller) आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांमध्ये खेळणार नाही. जॉस बटलरची पत्नी लुईस दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे, त्यामुळे बटलर आयपीएल खेळणार नाही. राजस्थान रॉयल्सच्या टीमसाठी हा मोठा धक्का आहे. याआधी जोफ्रा आर्चर (Jofra Archer) दुखापतीमुळे वर्षभरासाठी बाहेर झाला आहे, तर बेन स्टोक्सने (Ben Stokes) मानसिक आजारामुळे क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. जॉस बटलरच्याऐवजी राजस्थान रॉयल्सने न्यूझीलंडचा विकेट कीपर ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) याची आयपीएलच्या उरलेल्या मोसमासाठी निवड केली आहे. आयपीएलच्या या मोसमात राजस्थान रॉयल्सच्या टीमला संघर्ष करावा लागला आहे. 7 पैकी 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, तर 3 मॅच त्यांनी जिंकल्या. 6 पॉईंट्ससह राजस्थानची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासानुसार प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर टीमला 16 पॉईंट्स लागतात. 14 पॉईंट्ससह प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी टीमला इतर टीमच्या कामगिरीवर अवलंबून राहावं लागतं. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी राजस्थान रॉयल्सला 7 पैकी 4 किंवा 5 मॅच जिंकाव्या लागणार आहेत. बटलर, स्टोक्स आणि आर्चरच्या अनुपस्थितीमध्ये राजस्थानला हे आव्हान पेलणं जवळपास अशक्यच दिसत आहे.
  Published by:Shreyas
  First published: