मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 पुन्हा सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर

IPL 2021 पुन्हा सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्ससाठी खुशखबर

आयपीएलचे (IPL 2021) उरलेले सामने आता सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये (UAE) खेळवण्यात येणार आहेत. एकीकडे खेळाडूंच्या उपलब्धतेवरून आयपीएलच्या सगळ्या टीम चिंतेत असताना मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) मात्र दिलासादायक बातमी आहे.

मुंबई, 1 जून : आयपीएलचे (IPL 2021) उरलेले सामने आता सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये (UAE) खेळवण्यात येणार आहेत. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे 29 सामन्यांनंतर आयपीएल 4 मे रोजी स्थगित करण्यात आली. एकीकडे बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सामने युएईमध्ये खेळवणार आहे, पण टीमसमोर मात्र परदेशी खेळाडू उपलब्ध करण्याचं मोठं आव्हान आहे. बांगलादेश आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आधीच आपले खेळाडू आयपीएलचे उरलेले सामने खेळणार नाहीत, हे स्पष्ट केलं आहे. तसंच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या सहभागाबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. तर कॅरेबियन प्रीमियर लीग 19 सप्टेंबरला संपणार आहे, त्यामुळे वेस्ट इंडिजचे खेळाडू लवकर उपलब्ध व्हावेत, यासाठी बीसीसीआय विडींज बोर्डासोबत सीपीएल 10 दिवस लवकर सुरू करण्याबाबत चर्चा करत आहे.

एकीकडे खेळाडूंच्या उपलब्धतेवरून आयपीएलच्या सगळ्या टीम चिंतेत असताना मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) मात्र दिलासादायक बातमी आहे. मुंबईचा डावखुरा फास्ट बॉलर ट्रेन्ट बोल्ट (Trent Boult) याने आपण आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये जाणार असल्याचं सांगितलं.

एका ऑनलाईन पत्रकार परिषदेत बोलताना ट्रेन्ट बोल्ट म्हणाला, जर संधी मिळाली, तर मी स्पर्धा संपवण्यासाठी नक्कीच जाईन. 'भारत एक सुंदर ठिकाण आहे. भारतातले चाहते आणि तिथली संस्कृतीही चांगली आहे. पण यावेळची परिस्थिती वेगळी होती. रस्त्यावर लोक दिसत नव्हते. आवाजही नव्हता. आता आयपीएल युएईमध्ये जाणार आहे, मला संधी मिळाली तर मी नक्कीच जाईन. मागच्या वर्षीही माझी तिथली कामगिरी चांगली झाली होती,' असं वक्तव्य ट्रेन्ट बोल्टने केलं.

आयपीएलचा मागचा मोसम युएईमध्ये झाला होता, तेव्हा बोल्टने मुंबईचा चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. बोल्टने 15 मॅचमध्ये 25 विकेट घेतल्या होत्या. विरोधी टीमच्या ओपनिंग बॅट्समनना बोल्टने खूप त्रास दिला. यावेळी भारतात झालेल्या 7 मॅचमध्ये बोल्टला 8 विकेटच घेता आल्या. मुंबईने या मोसमात 7 पैकी 4 मॅच जिंकल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये ते चौथ्या क्रमांकावर आहेत.

First published:
top videos

    Tags: Cricket, IPL 2021, Mumbai Indians