IPL 2021 : कोरोनाचा फटका Cheerleaders ना, स्टेडियममध्ये एण्ट्री नसल्याने झालं एवढं नुकसान

IPL 2021 : कोरोनाचा फटका Cheerleaders ना, स्टेडियममध्ये एण्ट्री नसल्याने झालं एवढं नुकसान

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) कोरोनाच्या संकटात सुरुवात झाली आहे. कोरोनाचा (Corona Virus) धोका पुन्हा वाढल्यामुळे यंदा स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने होत आहेत, तसंच चीयरलीडरनाही (Cheerleaders) यंदा मैदानात परवानगी देण्यात आलेली नाही.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) कोरोनाच्या संकटात सुरुवात झाली आहे. कोरोनाचा (Corona Virus) धोका पुन्हा वाढल्यामुळे यंदा स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवायच सामने होत आहेत, तसंच चीयरलीडरनाही (Cheerleaders) यंदा मैदानात परवानगी देण्यात आलेली नाही. यामुळे चीयरलीडर्सचं आर्थिक नुकसान झालं आहे. या स्पर्धेत वेगवेगळ्या देशाच्या चीयरलीडर्स सहभागी होतात. आयपीएलमध्ये खेळाडूंना किती पैसे मिळतात, हे सगळ्यांना कळतं पण चीयरलीडर्सच्या कमाईविषयी फार कोणालाही कल्पना नसते.

2014 साली क्रन्ची स्पोर्ट्सने केलेल्या सर्वेक्षणानुसार प्रत्येक चीयरलीडरला एका मोसमात 15 हजार डॉलर मिळतात. 2016 साली झालेल्या आणखी एका सर्वेक्षणानुसार चीयरलीडरने आयपीएल पार्टी आणि पुरस्कार सोहळ्यामध्ये परफॉर्म केलं तर त्यांची कमाई जास्त होते. या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक चीयरलीडरला एका मोसमात 20 हजार डॉलर मिळतात, असा दावा करण्यात आला आहे.

आयपीएलच्या प्रत्येक सामन्यासाठी चीयरलीडरला 350 ते 500 डॉलर, पार्टीमध्ये 2,500 डॉलरपर्यंत पैसे कमावता येतात. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर त्यांच्या चीयरलीडरना सर्वाधिक 500 डॉलर देत असल्याचं या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे.

आयपीएलच्या चीयरलीडरना मॅचची फ्री तिकीट, स्टेडियममध्ये पार्किंगसाठी फुकट जागा, जेवण, हॉटेलमध्ये बुकिंग मिळतं. याशिवाय त्यांच्या कपड्यांवरच्या जाहिरातीतूनही चीयरलीडरच्या कंपनीला पैसे मिळतात.

Published by: Shreyas
First published: April 17, 2021, 8:01 PM IST

ताज्या बातम्या