• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : 20 लाखांच्या बॉलरने मुंबईचं कंबरडं मोडलं, 14 वर्षात पहिल्यांदाच झालं हे रेकॉर्ड

IPL 2021 : 20 लाखांच्या बॉलरने मुंबईचं कंबरडं मोडलं, 14 वर्षात पहिल्यांदाच झालं हे रेकॉर्ड

आयपीएल 2021 च्या पहिल्याच सामन्यात (IPL 2021) क्रिकेट रसिकांना नवा स्टार सापडला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेलने (Harshal Patel) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅटिंगचं कंबरडं मोडलं.

 • Share this:
  चेन्नई, 9 एप्रिल : आयपीएल 2021 च्या पहिल्याच सामन्यात (IPL 2021) क्रिकेट रसिकांना नवा स्टार सापडला. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेलने (Harshal Patel) मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) बॅटिंगचं कंबरडं मोडलं. सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरेल्या मुंबईचे 5 खेळाडू हर्षल पटेलने आऊट केले. मुंबई इंडियन्सविरुद्ध 5 विकेट घेणारा हर्षल पटेल 14 आयपीएल मोसमांमधला पहिलाच खेळाडू ठरला आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातल्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून मुंबईला पहिले बॅटिंगला बोलावलं. यानंतर मुंबईने चांगली सुरूवात केली. फक्त 12.2 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून मुंबईने 100 रन केले. तेव्हा मुंबईची टीम 180 रनच्या पुढे जाईल असं वाटत होतं, पण हर्षल पटेलने उत्कृष्ट बॉलिंग करत मुंबईचं स्वप्न धुळीस मिळवलं. हर्षल पटेलने हार्दिक पांड्याची पहिली विकेट घेतली, तेव्हा मुंबईचा स्कोअर 135 रन होता. यानंतर 10 रननी लगेच इशान किशनलाही हर्षलने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. इशान किशनच्या विकेटनंतर मुंबईचा रन करण्याचा वेग मंदावला. हर्षल पटेलने इनिंगच्या शेवटच्या ओव्हरमध्ये कृणाल पांड्या, कायरन पोलार्ड आणि मार्को जेनसन यांची विकेट घेतली. आयपीएलच्या या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात हर्षलने चमकदार कामगिरी केली. हर्षल पटेलने 4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 5 विकेट घेतल्या. गुजरातच्या हर्षल पटेलने 12 बॉलवर एकही रन दिली नाही. आयपीएलच्या मागच्या मोसमात हर्षल पटेल दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये होता. दिल्लीने हर्षलला 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं, पण बँगलोरने यावर्षी त्याला ट्रेडिंगमध्ये दिल्लीकडून विकत घेतलं.
  Published by:Shreyas
  First published: