IPL 2021 : 3 वर्षांपूर्वी झालेल्या अपमानाचा बदला हर्षल पटेलने मुंबईविरुद्ध घेतला

IPL 2021 : 3 वर्षांपूर्वी झालेल्या अपमानाचा बदला हर्षल पटेलने मुंबईविरुद्ध घेतला

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेलने (Harshal Patel) शुक्रवारी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) 5 बॅट्समनना आऊट केलं. हर्षल पटेलच्या या कामगिरीमुळे वर्षाच्या पहिल्याच सामन्यात बँगलोरचा विजय झाला.

  • Share this:

चेन्नई, 13 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) फास्ट बॉलर हर्षल पटेलने (Harshal Patel) शुक्रवारी मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) 5 बॅट्समनना आऊट केलं. हर्षल पटेलच्या या कामगिरीमुळे वर्षाच्या पहिल्याच सामन्यात बँगलोरचा विजय झाला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच बॉलरने मुंबईविरुद्ध पाच विकेट घ्यायचा विक्रम केला. या कामगिरीनंतर हर्षल पटेलने मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला तेव्हा त्याने झालेल्या अपमानाचा किस्सा सांगितला.

'2018 साली झालेल्या आयपीएलच्या लिलावात कोणत्याच टीमने मला विकत घेतलं नाही, त्यामुळे मी नाराज झालो. या गोष्टीमुळे माझा अपमान झाला, कारण मला असा विजेता खेळाडू बनायची इच्छा होती, ज्याला जास्त मागणी असेल. यानंतर मी स्वत:ची बॅटिंग सुधरवण्याचा निर्णय घेतला. लोकांनी माझ्या बॅटिंगवर विश्वास दाखवला तर नक्कीच माझ्यावरचा भरवसा वाढेल आणि मी आणखी प्रभावी खेळाडू होईन, म्हणून मी बॅटिंगवर काम करायला सुरुवात केली,' असं हर्षल पटेलने सांगितलं.

मलाही आयपीएल कामगिरीशी जोडल्या गेलेल्या चिंतेचा सामना करावा लागला, कारण एक खराब मॅचमुळे तुम्ही टीमबाहेर जाऊ शकता. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अनेक खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, ज्यांना फार अनुभव नाही आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं नाही. टीम प्रशासनाने विचार करण्याचा दृष्टीकोन बदलला असल्याचं मत हर्षल पटेलने मांडलं.

हर्षल पटेल दिल्ली कॅपिटल्सच्या टीममधून बँगलोरकडे आला आणि विराट कोहलीने पहिल्याच सामन्यात हर्षलला डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग दिली. ही कामगिरी चोख बजावल्यामुळे आपण खूश असल्याचं हर्षल म्हणाला. दिल्लीकडे कागिसो रबाडा आणि एनरिक नॉर्किया सारखे खेळाडू होते, त्यामुळे मला तिकडे संधी मिळणं मुश्कील होतं, पण बँगलोरच्या टीममध्ये मात्र मला खेळायला मिळेल, त्यामुळे दिल्ली सोडण्याचा निर्णय माझ्यासाठी चांगला होता. ज्या टीममध्ये स्वत:चं कौशल्या दाखवायची संधी मिळते आणि कठीण परिस्थितीमध्ये बॉलिंग मिळते, तिकडे खेळणं नक्कीच चांगलं आहे, असं वक्तव्य हर्षल पटेलने केलं.

Published by: Shreyas
First published: April 13, 2021, 5:41 PM IST

ताज्या बातम्या