• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : मुंबईकडून पदार्पणाला 6 वर्ष पूर्ण, हार्दिक झाला भावुक

IPL 2021 : मुंबईकडून पदार्पणाला 6 वर्ष पूर्ण, हार्दिक झाला भावुक

IPL मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करून हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) 6 वर्ष झाली आहेत. टीमसोबतच्या या प्रवासाविषयी आणि नात्याविषयी हार्दिकने भावनिक ट्वीट केलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 19 एप्रिल : मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ही आयपीएलची (IPL) सगळ्यात यशस्वी टीम आहे. आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा मुंबईने आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. मुंबईच्या टीमने शोधून काढलेले हिरे या यशाचे शिल्पकार आहेत. हार्दिक पांड्या (Hardik Pandya), कृणाल पांड्या (Krunal Pandya), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), इशान किशन (Ishan Kishan), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), राहुल चहर (Rahul Chahar) या खेळाडूंना मुंबई इंडियन्सने संधी दिली आणि पुढे ते टीम इंडियासाठीही खेळले. या खेळाडूंना टीम इंडियापर्यंत पोहोचवण्यात मुंबई इंडियन्सचा महत्त्वाचा वाटा आहे, त्यामुळे या खेळाडूंचं मुंबईच्या टीमशी भावनिक नातं जुळलं आहे. मुंबईच्या टीमचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने या नात्याविषयी भावुक ट्वीट केलं आहे. मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करून हार्दिक पांड्याला 6 वर्ष झाली आहेत. 19 एप्रिल 2015 ला हार्दिक पांड्या पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये मैदानात उतरला. तेव्हापासून आतापर्यंतच्या प्रवासाचा एक व्हिडिओ हार्दिकने शेयर केला आहे. त्याच वर्षात हार्दिकने कोलकात्याविरुद्ध 31 बॉलमध्ये 61 रनची खेळी करत स्वत: मधलं टॅलेन्ट दाखवलं. 'मुंबईकडून पदार्पण करण्याला आज 6 वर्ष झाली. 6 वर्षांचा हा प्रवास सर्वोत्कृष्ट होता. ही टीम माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. या प्रवासात साथ दिल्याबद्दल टीम मॅनेजमेंट, स्टाफ, सहकारी आणि चाहत्यांचे मनापासून धन्यवाद, ' असं हार्दिक त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे. 2015, 2017, 2019, 2020 या मोसमात मुंबईच्या विजयामध्ये हार्दिक पांड्याचा मोलाचा वाटा आहे. आतापर्यंत 83 सामन्यांमध्ये त्याने 157.45 च्या स्ट्राईक रेटने 1,384 रन केले आहेत, तर 42 विकेट घेतल्या आहेत.
  Published by:Shreyas
  First published: