• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या 2 खेळाडूंची धमाकेदार एन्ट्री, लक्झरी कारमधून हॉटेलमध्ये, VIDEO

IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या 2 खेळाडूंची धमाकेदार एन्ट्री, लक्झरी कारमधून हॉटेलमध्ये, VIDEO

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल झाले दोन स्टार खेळाडू

मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दाखल झाले दोन स्टार खेळाडू

आयपीएल 2021 (IPL 2021) चं दुसरं सत्र आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. त्याआधी मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) ऑलराऊंडर आणि स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्याही (Krunal Pandya) टीमसोबत जोडले गेले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 26 ऑगस्ट : आयपीएल 2021 (IPL 2021) चं दुसरं सत्र आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. कोरोनामुळे आयपीएल मे महिन्यात स्थगित केल्यानंतर आता उरलेले सामने युएईमध्ये (UAE) खेळवले जाणार आहेत. यासाठी काही टीम युएईमध्ये दाखल झाल्या आहेत. मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) ऑलराऊंडर आणि स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्याही (Krunal Pandya) टीमसोबत जोडले गेले आहेत. हार्दिक पांड्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक आणि कृणाल लक्झरी कारमधून हॉटेलमध्ये जात आहेत. हार्दिकच्या या व्हिडिओवर त्याची पत्नी नताशा आणि कृणालची पत्नी पंखुडी यांनीही कमेंट केली आहे. तर मुंबई इंडियन्सने चला कामावर परतूया, अशी कमेंट केली आहे.
  19 सप्टेंबरपासून आयपीएलच्या या मोसमाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे. पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स (Mumbai Indians vs Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्सचे काही खेळाडू या महिन्याच्या सुरुवातीलाच युएईमध्ये पोहोचले आणि ट्रेनिंगलाही सुरुवात केली. युएईमध्ये अबु धाबी, शारजाह आणि दुबई या तीन स्टेडियमवर आयपीएल सामने खेळवले जाणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर लगेच टी-20 वर्ल्ड कपलाही (T20 World Cup) युएई आणि ओमानमध्ये सुरुवात होणार आहे.
  Published by:Shreyas
  First published: