IPL 2021 : 6 महिन्यात या भारतीय खेळाडूमुळे बदललं मॅक्सवेलचं नशीब!

IPL 2021 : 6 महिन्यात या भारतीय खेळाडूमुळे बदललं मॅक्सवेलचं नशीब!

आयपीएलच्या या मोसमात (IPL 2021) ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या आयपीएलमध्ये एक-एक रन काढण्यासाठी संघर्ष करणारा ग्लेन मॅक्सवेल यंदा मात्र रंगात दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : आयपीएलच्या या मोसमात (IPL 2021) ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) चांगल्या फॉर्ममध्ये आहे. सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या आयपीएलमध्ये एक-एक रन काढण्यासाठी संघर्ष करणारा ग्लेन मॅक्सवेल यंदा मात्र रंगात दिसत आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यामुळे मॅक्सेवलमध्ये बदल झाल्याचं ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर ब्रेट ली (Brett Lee) म्हणाला आहे. विराटने मॅक्सवेलवर सकारात्मक प्रभाव टाकला आहे. त्याच्यासोबतच मॅक्सवेल पांढऱ्या बॉलने बॅटिंग करण्याची योग्य पद्धत शिकत आहे, अशी प्रतिक्रिया ब्रेट लीने दिली.

पहिले दोन सामने पाहून तरी असंच वाटत आहे. मॅक्सवेलने कोहलीसोबत क्रीजवर चांगला वेळ घालवला. कोहली मॅक्सवेलचं सामर्थ्य बनला आहे, असं ली स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला. कोहलीच्या उपस्थितीमुळे मॅक्सवेलची एकाग्रता वाढली आहे. तो पहिल्यासारखी घाई करत नाही. त्यामुळे कोहली त्याच्यासाठी चांगला सहकारी ठरत असल्याचं दिसत आहे. पहिले दोन सामने याचे पुरावे आहेत, असं वक्तव्य ब्रेट लीने केलं.

आयपीएलच्या या मोसमात आरसीबीची सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये विराटच्या टीमचा विजय झाला आहे, त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी पहिल्या क्रमांकावर आहे. मॅक्सवेलने मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात कठीण खेळपट्टीवर 28 बॉलमध्ये 39 रन केले. या मॅचमध्ये त्याने दोन सिक्सही मारले होते, यातला एक सिक्स 100 मीटरचा होता आणि बॉल स्टेडियम बाहेर गेला.

यानंतर हैदराबादविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहली (33), देवदत्त पडिक्कल (11) आणि एबी डिव्हिलियर्स (1) लवकर आऊट झाल्यानंतर मॅक्सवेलने बँगलोरची बॅटिंग सांभाळली. त्याने 41 बॉलमध्ये 59 रन केले, यात 5 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. मॅक्सवेलच्या या खेळीमुळे आरसीबीने हैदराबादला 150 रनचं आव्हान दिलं होतं. मॅक्सवेलचं आयपीएलमधलं हे 7वं अर्धशतक होतं. 5 वर्ष आणि 40 इनिंगनंतर त्याने अर्धशतकं केलं.

आयपीएलच्या मागच्या मोसमात पंजाबकडून खेळताना मॅक्सवेलला संघर्ष करावा लागला होता. त्याने खेळलेल्या 13 मॅचमध्ये एकही सिक्स मारता आली नव्हती, तसंच त्याला फक्त 108 रनच करता आल्या होत्या, त्यामुळे पंजाबने त्याला लिलावाआधी सोडून दिलं, पण बँगलोरने 14.25 कोटी रुपयांची बोली लावून त्याला विकत घेतलं.

Published by: Shreyas
First published: April 17, 2021, 9:01 PM IST

ताज्या बातम्या