• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : गंभीरचा पुन्हा एकदा 'फिनिशर' धोनीवर निशाणा, माहीचे चाहते भडकले

IPL 2021 : गंभीरचा पुन्हा एकदा 'फिनिशर' धोनीवर निशाणा, माहीचे चाहते भडकले

भारताचा माजी ओपनर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पुन्हा एकदा एमएस धोनीवर (MS Dhoni) निशाणा साधला आहे.

 • Share this:
  मुंबई, 2 ऑक्टोबर : भारताचा माजी ओपनर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) पुन्हा एकदा एमएस धोनीवर (MS Dhoni) निशाणा साधला आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर नेता झालेला गंभीर नेहमीच रोखठोक बोलतो, ज्यामुळे अनेकवेळा वाद निर्माण होतो. यावेळी गंभीरने अप्रत्यक्षरित्या धोनीच्या बॅटिंग क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आणि 'तथाकथित फिनिशर' म्हणाला. दुबईमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स (KKR vs PBKS) यांच्यात झालेल्या सामन्यावेळी गंभीर कॉमेंट्री करत होता. यावेळी गंभीरला सध्याच्या क्रिकेटमधल्या फिनिशर बाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्याने विराट कोहली बेस्ट फिनिशर असल्याचं सांगितलं. आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) आकडे तथाकथित फिनिशरपेक्षा चांगले आहेत, असं वक्तव्य गंभीरने केलं. 'आंद्रे रसेलला (Andre Russell) फिनिशर मानलं जातं, पण विराट मागच्या काही वर्षांमधला सर्वोत्तम फिनिशर आहे आणि तो तिसऱ्या क्रमांकावरही बॅटिंग करतो. फक्त फिनिशर म्हणून कोणी फिनिशर होत नाही. तथाकथित फिनिशरपेक्षा विराट खूप चांगला आहे,' अशी प्रतिक्रिया गंभीरने दिली. गंभीरने त्याच्या वक्तव्यामध्ये धोनीचं नाव घेतलं नसलं तरी चाहत्यांना मात्र तो धोनीलाच बोलत आहे, असं वाटलं. धोनीच्या चाहत्यांनीही मग गंभीरला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुनवायला सुरुवात केली. धोनीने 11 मॅचमध्ये केले फक्त 66 रन आयपीएलच्या या मोसमात धोनीची बॅट शांत राहिली आहे. 11 सामन्यांमध्ये त्याला फक्त 66 रन करता आले आहेत, त्याचा स्ट्राईक रेटही फक्त 110 चा आहे. धोनीच्या या कामगिरीवरून गंभीरनं अप्रत्यक्ष निशाणा साधल्याचं चाहत्यांना वाटत आहे. धोनीवर टीका करायची असेल तर गंभीर कोहलीचं कौतुक करतो आणि विराटवर टीका करायची असते तेव्हा तो रोहितचं कौतुक करतो, अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने दिली.
  Published by:Shreyas
  First published: