मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 वर कोरोनाचं संकट, 4 खेळाडूंसह ब्रॉडकास्टिंग टीम-ग्राऊंड स्टाफही पॉझिटिव्ह

IPL 2021 वर कोरोनाचं संकट, 4 खेळाडूंसह ब्रॉडकास्टिंग टीम-ग्राऊंड स्टाफही पॉझिटिव्ह

आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. पण आयपीएल खेळण्यासाठी आलेले खेळाडू, मैदानातले कर्मचारी आणि ब्रॉडकास्टिंग टीमच्या सदस्यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. पण आयपीएल खेळण्यासाठी आलेले खेळाडू, मैदानातले कर्मचारी आणि ब्रॉडकास्टिंग टीमच्या सदस्यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे.

आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. पण आयपीएल खेळण्यासाठी आलेले खेळाडू, मैदानातले कर्मचारी आणि ब्रॉडकास्टिंग टीमच्या सदस्यांना कोरोनाची (Corona Virus) लागण झाली आहे.

मुंबई, 8 एप्रिल : आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शुक्रवार 9 एप्रिलपासून जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट लीगला सुरूवात होणार आहे. सहा महिन्यांमध्ये दुसऱ्यांदा आयपीएलचा आनंद लुटण्यासाठी चाहते तयार आहेत. मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) स्पर्धा युएईमध्ये खेळवण्यात आली होती. तर यावर्षी कोरोनामुळेच प्रेक्षकांशिवाय मॅच होणार असल्या तरी स्पर्धेवरचं संकट कायम आहे. आयपीएल खेळण्यासाठी आलेले खेळाडू, मैदानातले कर्मचारी आणि ब्रॉडकास्टिंग टीमच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आयपीएलमध्ये जवळपास एका आठवड्यात 4 खेळाडूंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोलकात्याचा (KKR) बॅट्समन नितीश राणाला (Nitish Rana) कोरोना झाला, पण आता नितीशने कोरोनाची लढाई जिंकली असून त्याने सरावालाही सुरूवात केली आहे.

दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे (RCB) दोन खेळाडू देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) आणि डॅनियल सॅम्स (Daniel Sams) यांनाही कोरोना झाला, पण आता या दोघांचीही कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. हे दोन्ही खेळाडू लवकरच फिट होतील, अशी अपेक्षा आरसीबीला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) ऑलराऊंडर अक्षर पटेल (Axar Patel) यादेखील कोरोनापासून वाचला नाही. 28 मार्चला अक्षर जेव्हा टीमशी जोडला गेला तेव्हा त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, पण आयपीएल प्रोटोकॉलनुसार पुन्हा एकदा त्याची टेस्ट करण्यात आली तेव्हा ती पॉझिटिव्ह आली, त्यामुळे अक्षर आता सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळणार नाही.

भारताचे माजी क्रिकेटपटू किरण मोरे (Kiran More) यांनाही कोरोना झाला आहे. टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष राहिलेले किरण मोरे सध्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) टॅलेंट स्काऊट आणि विकेट कीपिंग सल्लागार आहेत. 6 एप्रिलला किरण मोरेंची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्यानंतर ते विलगिकरणात गेले आहेत.

खेळाडूंप्रमाणेच मैदानातले कर्मचारी आणि ब्रॉडकास्टिंग टीमचे सदस्यही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या 11 कर्मचाऱ्यांना तसंच मुंबईत प्रसारणाची तयारी करणाऱ्या ब्रॉडकास्टिंग टीमच्या 14 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona virus in india, IPL 2021