• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : 2 आयपीएल 11 सामने, पुणेकर ऋतुराजच्या करियरमध्ये पहिल्यांदाच घडलं असं

IPL 2021 : 2 आयपीएल 11 सामने, पुणेकर ऋतुराजच्या करियरमध्ये पहिल्यांदाच घडलं असं

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्सची (CSK) टीम शानदार फॉर्ममध्ये आहे. फाफ डुप्लेसिस (Faf Duplesis) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांनी दिलेल्या चांगल्या सुरुवातीमुळे चेन्नईला यावेळी इतके सामने जिंकता आले आहेत.

 • Share this:
  मुंबई, 25 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्सची (CSK) टीम शानदार फॉर्ममध्ये आहे. 4 पैकी 3 सामने जिंकणारी धोनीची टीम पॉईंट्स टेबलमध्येही दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या मागच्या हंगामात प्ले-ऑफही गाठता न आलेल्या चेन्नईच्या कामगिरीमध्ये यंदा कमालीची सुधारणा झाली आहे. फॉर्ममध्ये असलेले बॅट्समन हे त्यांच्या यावर्षाच्या यशाचं मुख्य कारण आहे. फाफ डुप्लेसिस (Faf Duplesis) आणि ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांनी दिलेल्या चांगल्या सुरुवातीमुळे चेन्नईला यावेळी इतके सामने जिंकता आले आहेत. रविवारी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या (RCB vs CSK) सामन्यातही फाफ आणि ऋतुराजच्या जोडीने चेन्नईला 9.1 ओव्हरमध्येच 74 रनची सुरुवात करून दिली, पण ऋतुराज 33 रनवर आऊट झाला, याचसोबत त्याच्या नावावर नकोशा रेकॉर्डची नोंद झाली आहे. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच 11 किंवा त्यापेक्षा जास्त रन केल्यानंतर ऋतुराजला अर्धशतक करता आलेलं नाही. आयपीएल (IPL) इतिहासात ऋतुराजने 11 सामन्यांमध्ये 35.66 ची सरासरी आणि 117.58 च्या स्ट्राईक रेटने 321 रन केल्या, यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल करियरमध्ये ऋतुराजचा सर्वाधिक स्कोअर 72 रन आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात लागोपाठ तीन सामन्यांमध्ये ऋतुराजने अर्धशतकं केली होती. आयपीएल इतिहासात एखाद्या अनकॅप प्लेयरकडून लागोपाठ 3 अर्धशतकं करणारा ऋतुराज पहिलाच खेळाडू होता. तर या मोसमातही त्याने एक अर्धशतक केलं आहे. आयपीएलच्या 11 सामन्यांमध्ये ऋतुराजने 0, 5, 0, 65, 72, 62, 5, 5, 10, 64, 33 अशा रन केल्या आहेत.
  Published by:Shreyas
  First published: