IPL 2021 : दोघांना कोरोना झाल्यानंतर KKR च्या खेळाडूची पहिली प्रतिक्रिया, शाहरुखला म्हणाला...

IPL 2021 : दोघांना कोरोना झाल्यानंतर KKR च्या खेळाडूची पहिली प्रतिक्रिया, शाहरुखला म्हणाला...

आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या (IPL 2021) अर्ध्या मॅच झाल्या आहेत, पण आता स्पर्धेसमोर कोरोनाचं संकट उभं ठाकलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 3 मे : आयपीएलच्या यंदाच्या मोसमातल्या (IPL 2021) अर्ध्या मॅच झाल्या आहेत, पण आता स्पर्धेसमोर कोरोनाचं संकट उभं ठाकलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर कोलकाता आणि बँगलोर (KKR vs RCB) यांच्यातली सोमवारी होणारी मॅच स्थगित करण्यात आली आहे. याशिवाय चेन्नई सुपरकिंग्समधल्या (CSK) तीन सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे, हे तिन्ही सदस्य खेळाडू नसल्याची माहिती समोर आली आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार खांद्याच्या स्कॅनिंगसाठी वरुण चक्रवर्तीला बायो-बबलच्या बाहेर नेण्यात आलं, पण तो ग्रीन चॅनलच्या माध्यमातून स्कॅनिंगसाठी गेला होता, तिकडे त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केकेआरच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं, पण त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर मात्र फक्त कोलकाता आणि बँगलोर यांच्यातला सामना पुढे ढकलण्यात आला आहे, एवढंच ट्वीट करण्यात आलं. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आजचा सामना पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता कोलकात्याचा खेळाडू आणि टीम इंडियाचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंग (Harbhajan Singh) याने ट्वीट करून पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्या सगळ्यांसोबत असल्याबद्दल शाहरुख खान (Shahrukh Khan), केकेआर आणि टीमचे सीईओ वैंकी मैसूर यांचे आभार, असं ट्वीट हरभजन सिंगने केलं आहे. याचसोबत त्याने केकेआर फॅमिली असा हॅशटॅगही दिला आहे.

Published by: Shreyas
First published: May 3, 2021, 7:49 PM IST

ताज्या बातम्या