मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Final नंतर क्रिकेट साऊथ आफ्रिकाने शेयर केला PHOTO, डुप्लेसिस-स्टेन भडकल्यानंतर डिलीट

IPL Final नंतर क्रिकेट साऊथ आफ्रिकाने शेयर केला PHOTO, डुप्लेसिस-स्टेन भडकल्यानंतर डिलीट

एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL Final 2021) चेन्नईने कोलकात्याचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला. फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 16 ऑक्टोबर : एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) चौथ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL Final 2021) चेन्नईने कोलकात्याचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला. फाफ डुप्लेसिस (Faf Du Plessis) चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. फाफने 86 रनची शानदार खेळी केली, त्यामुळे चेन्नईने कोलकात्याला विजयासाठी 192 रनचं आव्हान दिलं. फाफच्या या कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने (Cricket South Africa) चेन्नई सुपर किंग्सला या विजयाच्या शुभेच्छा दिल्या, पण यावरून मोठा वाद झाला, अखेर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली.

चेन्नईने दिलेल्या 192 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 159 रनच करता आले. केकेआरचे ओपनर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी अर्धशतकं करूनही त्यांची बॅटिंग गडगडली.

सीएसके चॅम्पियन झाल्यानंतर क्रिकेट साऊथ आफ्रिकाने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लुंगी एनगिडीचा (Lungi Ngidi) एक फोटो शेयर केला. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना आयपीएल ट्रॉफी जिंकल्याबद्दल लुंगी एनगिडीचे अभिनंदन, असं कॅप्शन क्रिकेट साऊथ आफ्रिकाने या फोटोला दिलं. लुंगी एनगिडीचा हा फोटो सीएसकेच्या पिवळ्या जर्सीमधला होता. क्रिकेट साऊथ आफ्रिकाच्या या पोस्टवरून मोठा वाद झाला, कारण लुंगी एनगिडी फायनलमध्ये सीएसकेच्या प्लेयिंग इलेव्हनमध्येही नव्हता. या सामन्यात मॅन ऑफ द मॅच असलेल्या आपल्याच देशाच्या फाफ डुप्लेसिसचा उल्लेख क्रिकेट साऊथ आफ्रिकाने टाळला.

क्रिकेट साऊथ आफ्रिकाची ही पोस्ट बघून खुद्द फाफ डुप्लेसिसही संतापला. खरंच क्रिकेट साऊथ आफ्रिका? अशी कमेंट फाफ डुप्लेसिसने या फोटोवर केली. डेल स्टेन (Dale Steyn) यानेही या पोस्टवर आक्षेप घेतले. 'हे अकाऊंट कोण चालवत आहे? फाफने अजूनपर्यंत निवृत्ती घेतलेली नाही. इम्रान ताहीरनेही नाही. या दोघांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेटची अनेक वर्ष सेवा केली. त्यांच्या नावाचा उल्लेखही केला जाऊ नये. हा वाह्यात पणा आहे,' असं डेल स्टेन म्हणाला.

वाद वाढल्यानंतर क्रिकेट साऊथ आफ्रिकेने या पोस्टवरचं कमेंट सेक्शन ब्लॉक केलं. यानंतर स्टेनने ट्वीट केलं. 'क्रिकेट साऊथ आफ्रिकाने आता कमेंट सेक्शन ब्लॉक केलं आहे. त्यांनी पोस्ट डिलीट करावी आणि सगळ्यांची नावं पोस्टमध्ये घ्यावी. अशा लाजिरवाण्या गोष्टींपासून स्वत:ला वाचवा,' असा सल्ला स्टेनने दिला. क्रिकेट साऊथ आफ्रिकाने काही वेळानंतर ही पोस्ट डिलीट केली.

First published:

Tags: Csk, IPL 2021