मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 Final : डुप्लेसिस आऊट झाल्यामुळे ऋतुराजने घडवला इतिहास, विराटलाही टाकलं मागे

IPL 2021 Final : डुप्लेसिस आऊट झाल्यामुळे ऋतुराजने घडवला इतिहास, विराटलाही टाकलं मागे

चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (CSK vs KKR) आयपीएल फायनलमध्ये (IPL Final) इतिहास घडवला.

चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (CSK vs KKR) आयपीएल फायनलमध्ये (IPL Final) इतिहास घडवला.

चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (CSK vs KKR) आयपीएल फायनलमध्ये (IPL Final) इतिहास घडवला.

    दुबई, 15 ऑक्टोबर : चेन्नई सुपर किंग्सचा ओपनर ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (CSK vs KKR) आयपीएल फायनलमध्ये (IPL Final) इतिहास घडवला. ऋतुराज गायकवाड आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात लहान वयात ऑरेंज कॅप (IPL Orange Cap) जिंकणारा खेळाडू ठरला आहे. फायनलआधी ऋतुराजला ऑरेंज कॅप केएल राहुलकडून (KL Rahul) घेण्यासाठी 24 रनची गरज होती. केकेआरचा कर्णधार इयन मॉर्गनने (Eoin Morgan) टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर ओपनिंगला बॅटिंगला आलेल्या ऋतुराजने 27 बॉलमध्ये 32 रनची खेळी केली आणि केएल राहुलला मागे टाकून ऑरेंज कॅप पटकावली. आयपीएलच्या या मोसमात ऋतुराजने 16 सामन्यांमध्ये 43.35 च्या सरासरीने आणि 136.26 च्या स्ट्राईक रेटने 635 रन केले. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावरही चेन्नई सुपर किंग्सचाच ओपनर फाफ डुप्लेसिस आहे. फाफने 16 इनिंगमध्ये 45.21 च्या सरासरीने आणि 138.20 च्या स्ट्राईक रेटने 633 रन केले. फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) फायनलमध्ये 59 बॉल खेळून 86 रन केले. ऋतुराजच्या पुढे जाऊन ऑरेंज कॅप पटकावण्यासाठी फाफला शेवटच्या बॉलवर फक्त तीन रनची गरज होती. इनिंगच्या अखेरच्या बॉलवर फाफने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला, पण बाऊंड्री लाईनवर उभ्या असलेल्या व्यंकटेश अय्यरने त्याचा कॅच पकडला आणि ऑरेंज कॅप ऋतुराज गायकवाडकडेच राहिली. यंदाच्या आयपीएलमधले सर्वाधिक रन करणारे खेळाडू 635 – ऋतुराज गायकवाड 633 – फाफ डुप्लेसिस 626 – केएल राहुल 587 – शिखर धवन 513 – ग्लेन मॅक्सवेल ऑरेंज कॅप एका मोसमात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. आयपीएलच्या या मोसमात ऋतुराज शानदार फॉर्ममध्ये होता. आयपीएल 2020 च्या अखेरच्या तीन मॅचमध्ये ऋतुराजने अर्धशतकं केली होती. यानंतर आयपीएल 2021 च्या दुसऱ्या राऊंडमध्ये त्याने 88*, 38, 40, 45 आणि 101* रनची खेळ केली. दिल्लीविरुद्धच्या क्वालिफायर-1 मध्ये ऋतुराजने 70 रन केले आणि चेन्नईला फायनलमध्ये पोहोचवलं. विराटला टाकलं मागे सगळ्यात लहान वयात ऑरेंज कॅप मिळवत ऋतुराजने विराट कोहलीलाही मागे टाकलं आहे. 24 वर्ष 257 दिवस – ऋतुराज गायकवाड- 2021 24 वर्ष 328 दिवस – शॉन मार्श- 2008 27 वर्ष 206 दिवस – विराट कोहली- 2016 27 वर्ष 292 दिवस – केन विलियमसन- 2018
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021

    पुढील बातम्या