Home /News /sport /

IPL 2021 Final : धोनीने आयुष्यात पहिल्यांदाच सोडला असा कॅच, VIDEO पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही!

IPL 2021 Final : धोनीने आयुष्यात पहिल्यांदाच सोडला असा कॅच, VIDEO पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही!

कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स (KKR vs CSK) यांच्यातली आयपीएल फायनल (IPL 2021 Final) दोन्ही टीमच्या विकेट कीपरसाठी निराशाजनक राहिली. कारण या सामन्यात इनिंगच्या सुरुवातीलाच दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि एमएस धोनीने (MS Dhoni) मोठ्या चुका केल्या.

पुढे वाचा ...
    दुबई, 15 ऑक्टोबर : कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स (KKR vs CSK) यांच्यातली आयपीएल फायनल (IPL 2021 Final) दोन्ही टीमच्या विकेट कीपरसाठी निराशाजनक राहिली. कारण या सामन्यात इनिंगच्या सुरुवातीलाच दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि एमएस धोनीने (MS Dhoni) मोठ्या चुका केल्या. चेन्नईने दिलेल्या 193 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकात्याला सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने सुरुवातीलाच जीवनदान दिलं. चेन्नईच्या बॉलिंगच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये जॉस हेजलवूडने (Josh Hazlewood) टाकलेला बॉल व्यंकटेश अय्यरच्या (Venkatesh Iyer) बॅटच्या एजला लागला आणि एमएस धोनीकडे गेला, पण अगदी सोपा हातात आलेला कॅच धोनीला पकडता आला नाही. याआधी दिनेश कार्तिकनेही फाफ डुप्लेसिसचा सोपा स्टम्पिंग सोडला. कोलकात्याने मॅचची तिसरी ओव्हर शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) दिली, या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बॅटला बॉल लागला नाही. शाकिबने टाकलेला हा बॉल दिनेश कार्तिककडे गेला, पण त्याला हा बॉल पकडता आला नाही. दिनेश कार्तिकने फाफ डुप्लेसिसचा हातातला स्टम्पिंग सोडला. दिनेश कार्तिकने दिलेलं हे जीवनदान फाफ डुप्लेसिस आणि चेन्नईच्या चांगलंच पथ्थ्यावर पडलं. डुप्लेसिसने 35 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. फाफने 59 बॉलमध्ये 86 रन केले, यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. डुप्लेसिसच्या या खेळीमुळे चेन्नईने कोलकात्याला विजयासाठी 193 रनचं आव्हान ठेवलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, KKR, MS Dhoni

    पुढील बातम्या