• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IPL Final 2021 : 13 व्या बॉललाच KKR ने गमावली मॅच, हातातून गेली आयपीएल ट्रॉफी

IPL Final 2021 : 13 व्या बॉललाच KKR ने गमावली मॅच, हातातून गेली आयपीएल ट्रॉफी

एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आणखी एक आयपीएल ट्रॉफी (IPL Final) पटकावली आहे. आयपीएल फायनलमध्ये चेन्नईने कोलकात्याचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला आहे.

  • Share this:
    दुबई, 15 ऑक्टोबर : एमएस धोनीच्या (MS Dhoni) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) आणखी एक आयपीएल ट्रॉफी (IPL Final) पटकावली आहे. आयपीएल फायनलमध्ये चेन्नईने कोलकात्याचा (CSK vs KKR) 27 रनने पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या 193 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 165 रनपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात केकेआरचा कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. बॉलिंगसाठी मैदानात आल्यानंतर केकेआरने मॅचच्या 13 व्या बॉललाच सगळ्यात मोठी चूक केली, ज्यामुळे त्यांच्या हातातून आयपीएल ट्रॉफी निसटली. कोलकात्याने मॅचची तिसरी ओव्हर शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) दिली, या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या बॅटला बॉल लागला नाही. शाकिबने टाकलेला हा बॉल दिनेश कार्तिककडे (Dinesh Karthik) गेला, पण त्याला हा बॉल पकडता आला नाही. दिनेश कार्तिकने फाफ डुप्लेसिसचा हातातला स्टम्पिंग सोडला. दिनेश कार्तिकने दिलेलं हे जीवनदान फाफ डुप्लेसिस आणि चेन्नईच्या चांगलंच पथ्थ्यावर पडलं. डुप्लेसिसने 35 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. फाफने 59 बॉलमध्ये 86 रन केले, यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. डुप्लेसिसच्या या खेळीमुळे चेन्नईने कोलकात्याला विजयासाठी 193 रनचं आव्हान ठेवलं.
    Published by:Shreyas
    First published: