— Ves (@Ves84442098) October 15, 2021दिनेश कार्तिकने दिलेलं हे जीवनदान फाफ डुप्लेसिस आणि चेन्नईच्या चांगलंच पथ्थ्यावर पडलं. डुप्लेसिसने 35 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. फाफने 59 बॉलमध्ये 86 रन केले, यामध्ये 7 फोर आणि 3 सिक्सचा समावेश होता. इनिंगच्या अखेरच्या बॉलवर डुप्लेसिस आऊट झाला. डुप्लेसिसने पहिले ऋतुराज गायकवाडसोबत (Ruturaj Gaikwad) 61 रनची, मग रॉबिन उथप्पासोबत (Robin Uthappa) 63 रनची आणि मग मोईन अलीसोबत (Moeen Ali) 68 रनची पार्टनरशीप केली. फाफ डुप्लेसिस आयपीएलच्या या मोसमात 600 रनचा टप्पा ओलांडणारा तिसरा खेळाडू ठरला. फाफने यंदा 16 मॅचमध्ये 45.21 च्या सरासरीने आणि 138.20 च्या स्ट्राईक रेटने 633 रन केले. या मोसमात फाफच्या नावावर 6 अर्धशतकंही आहेत. याआधी याच सामन्यात चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडने 600 रन पूर्ण केले. ऋतुराजने 16 सामन्यांमध्ये 45.35च्या सरासरीने आणि 136.26 च्या स्ट्राईक रेटने 635 रन केले. तर पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुलला 13 सामन्यांमध्ये 62.60 ची सरासरी आणि 138.80 च्या स्ट्राईक रेटने 626 रन करता आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.