मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL Final मध्ये महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्रचा सामना, कोण मारणार बाजी?

IPL Final मध्ये महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्रचा सामना, कोण मारणार बाजी?

आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (CSK vs KKR) होणार आहे. या सामन्यात महाराष्ट्राचे दोन खेळाडूही आमने-सामने असणार आहेत.

आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (CSK vs KKR) होणार आहे. या सामन्यात महाराष्ट्राचे दोन खेळाडूही आमने-सामने असणार आहेत.

आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (CSK vs KKR) होणार आहे. या सामन्यात महाराष्ट्राचे दोन खेळाडूही आमने-सामने असणार आहेत.

  • Published by:  Shreyas

दुबई, 14 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या फायनलमध्ये (IPL 2021 Final) चेन्नई सुपर किंग्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (CSK vs KKR) होणार आहे. या सामन्यात महाराष्ट्राचे दोन खेळाडूही आमने-सामने असणार आहेत. महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेट खेळणारा ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) यांच्यात फायनलमध्ये वेगळीच लढत पाहायला मिळेल. या दोघांनीही यंदाच्या आयपीएलमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

ऋतुराज गायकवाड यंदाच्या मोसमात चेन्नईचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. ओपनिंगला खेळणाऱ्या ऋतुराजने या मोसमात 15 इनिंगमध्ये 46 च्या सरासरीने 603 रन केले, यामध्ये एक शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे, तसंच त्याचा स्ट्राईक रेट 137 चा आहे. या मोसमात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये ऋतुराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऋतुराजने आपल्या टी-20 करियरमध्ये 56 सामन्यांमध्ये 36 च्या सरासरीने 1,779 रन केले, यात एक शतक आणि 13 अर्धशतकं आहेत, त्याचा स्ट्राईक रेट 133 चा आहे.

IPL Final खेळत नाही, तरी Dhoni च्या CSK साठी लकी ठरणार हा खेळाडू, 3 टीमना मिळालाय विजय

राहुल त्रिपाठीही फॉर्ममध्ये

राहुल त्रिपाठी यावर्षी कोलकात्याकडून सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत 15 इनिंगमध्ये 30 च्या सरासरीने त्याने 395 रन केले आहेत, ज्यात त्याने 2 अर्धशतकं केली. राहुलचा स्ट्राईक रेटही 141 चा आहे. क्वालिफायर-2 च्या सामन्यात राहुलने अश्विनला शेवटच्या ओव्हरमध्ये सिक्स मारून रोमांचक विजय मिळवून दिला, ज्यामुळे कोलकात्याचा फायनलमध्ये प्रवेश झाला. राहुल त्रिपाठीने आपल्या टी-20 करियरमध्ये 102 मॅच खेळून 26 च्या सरासरीने 2147 रन केले आणि 12 अर्धशतकं केली. राहुल त्रिपाठीचा स्ट्राईक रेटही 130 चा आहे, तसंच त्याने 12 विकेटही घेतल्या.

बॅटिंगमध्ये चेन्नई पुढे

आयपीएलच्या या मोसमात चेन्नईचे बॅटर कोलकात्यापेक्षा पुढे आहेत. चेन्नईच्या दोघांनी 500 पेक्षा जास्त रन केल्या आहेत, तर केकेआरच्या एकाही खेळाडूला हा आकडा पार करता आला नाही. ऋतुराजशिवाय चेन्नईचा ओपनर फाफ डुप्लेसिसने (Faf Du Plessis) 15 इनिंगमध्ये 42 च्या सरासरीने 537 रन केले आणि 5 अर्धशतकं फटकावली. केकेआरकडून शुभमन गिलने (Shubhaman Gill) सर्वाधिक 427 रन केले आहेत, ज्यात 2 अर्धशतकं आहेत. गिलचा स्ट्राईक रेट 119 चा आहे. कोलकात्याच्या दुसऱ्या कोणत्याही खेळाडूला 400 रनचा टप्पा ओलांडता आला नाही.

IPL 2021 Final: KKR चा धोकादायक खेळाडू परतणार, CSK विरुद्ध आहे जबरदस्त रेकॉर्ड

First published:

Tags: Csk, IPL 2021, KKR