• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : कृणाल पांड्याचा अतिआक्रमकपणा, चाहत्यांनी सुनावलं, भन्नाट Memes Viral

IPL 2021 : कृणाल पांड्याचा अतिआक्रमकपणा, चाहत्यांनी सुनावलं, भन्नाट Memes Viral

पाचवेळा आयपीएल (IPL) जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) यंदाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पहिल्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. शुक्रवारी पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबईचा 9 विकेट आणि 14 बॉल राखून दारूण पराभव केला.

 • Share this:
  चेन्नई, 24 एप्रिल : पाचवेळा आयपीएल (IPL) जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) यंदाची कामगिरी निराशाजनक झाली आहे. पहिल्या पाच सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये मुंबईचा पराभव झाला आहे. शुक्रवारी पंजाब किंग्सने (Punjab Kings) मुंबईचा 9 विकेट आणि 14 बॉल राखून दारूण पराभव केला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात मुंबईची बॅटिंग सपशेल अपयशी ठरली आहे. आतापर्यंत एकदाही टीमला 160 रनचा पट्टा गाठता आलेला नाही. आयपीएलच्या पाच सामन्यांमध्ये मुंबईच्या फक्त दोन बॅट्समननाच अर्धशतकी खेळी करता आली. सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) कोलकात्याविरुद्ध (KKR) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) पंजाबविरुद्ध अर्धशतक केलं. क्विंटन डिकॉक (Quinton De Kock), इशान किशन (Ishan Kishan), हार्दिक पांड्या (Hardik Pandya), कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि कायरन पोलार्ड (Kieron Pollard) संघर्ष करत आहेत. या सगळ्यांमध्ये पांड्या बंधूंनी सर्वाधिक निराशा केली आहे. कृणाल पांड्याने 5 सामन्यांमध्ये 7.25 ची सरासरी आणि 107.40 च्या स्ट्राईक रेटने फक्त 29 रन केले आहेत. तसंच बॉलिंगमध्ये कृणालने 3 विकेट घेतल्या. या मोसमात कृणालने एकूण 16 ओव्हर बॉलिंग केली, यात त्याने 38.66 च्या सरासरीने 116 रन दिले. चेन्नईची खेळपट्टी स्पिन बॉलरना मदत करणारी होती, तरीही कृणाल पांड्याला याचा फायदा उचलता आला नाही. भाऊ हार्दिक पांड्याप्रमाणेच कृणाल पांड्याही मैदानात शंभर टक्के द्यायचा प्रयत्न करतो, पण त्याला यश येत नाही, त्यामुळे अनेकवेळा कृणाल मैदानातच संतापलेला पाहायला मिळत आहे. कृणाल पांड्याची ही अतिआक्रमकता बघून चाहत्यांनी त्याच्यावर निशाणा साधला आहे. कृणाल पांड्याची मीम्सही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. आयपीएलमध्ये आता मुंबईचा सामना गुरूवारी राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. चेन्नईत 5 सामने खेळल्यानंतर आता मुंबईची टीम दिल्लीला रवाना झाली आहे. दिल्लीच्या मैदानात तरी टीमचं नशीब बदलेल, अशी अपेक्षा मुंबई इंडियन्स आणि त्यांच्या चाहत्यांना आहे.
  Published by:Shreyas
  First published: