Home /News /sport /

IPL 2021 : उरलेल्या मॅच सुरू व्हायच्या आधीच धक्का, या देशाचे खेळाडू खेळणार नाहीत

IPL 2021 : उरलेल्या मॅच सुरू व्हायच्या आधीच धक्का, या देशाचे खेळाडू खेळणार नाहीत

कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या 14व्या मोसमाला (IPL 2021) अर्ध्यातच थांबवण्यात आलं. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोना झाल्यामुळे बीसीसीआयला (BCCI) आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याता निर्णय घ्यावा लागला.

    मुंबई, 11 मे : कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या 14व्या मोसमाला (IPL 2021) अर्ध्यातच थांबवण्यात आलं. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोना झाल्यामुळे बीसीसीआयला (BCCI) आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याता निर्णय घ्यावा लागला. स्पर्धेच्या यंदाच्या मोसमातल्या 29 मॅच झाल्या असून 31 मॅच बाकी आहेत. आयपीएल स्थगित झाल्यानंतर आता खेळाडू त्यांच्या घरी पोहोचले आहेत. पण बीसीसीआय मात्र उरलेले 31 सामने कुठे खेळवायचे याबाबत विचार करत आहे. इंग्लंडमधले चार काऊंटी क्लब आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएल आपल्या इकडे खेळवण्याची ऑफर दिली आहे, तसंच बीसीसीआयपुढे युएईचा पर्यायही उपलब्ध आहे. आयपीएलचे उरलेले सामने भारतात होणार नाहीत, हे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) स्पष्ट केलं आहे. तसंच आयपीएल रद्द झाली तर बीसीसीआयचं 2500 कोटी रुपयांचं नुकसान होईल, असा अंदाज सौरव गांगुलीने व्यक्त केला. एकीकडे बीसीसीआय आयपीएलचे उरलेले सामने खेळवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांमध्ये इंग्लंडचे खेळाडू (England Players) सामील होणार नाहीत, असे संकेत इंग्लंडचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऍश्ले जाईल्स यांनी दिले आहेत. इंग्लंडच्या एक डझनपेक्षा अधिक खेळाडूंना आयपीएल खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. यासाठी न्यूझीलंडविरुद्ध 2 जूनपासून सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजमध्ये न खेळण्याची मूभाही त्यांना देण्यात आली. पण आता आयपीएलच्या उरलेल्या मॅच आणि इंग्लंडच्या ठरलेल्या सीरिज या एकाचवेळी होणार असल्यामुळे इंग्लंडचे खेळाडू आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे, असं ऍश्ले जाईल्स यांनी सांगितल्याचं वृत्त क्रिकइन्फोने दिलं आहे. सप्टेंबरचे शेवटचे 15 दिवस किंवा नोव्हेंबर महिन्यात आयपीएलचं आयोजन केलं जाऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी सगळे खेळाडू इंग्लंड टीमसोबत असतील.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Coronavirus, Cricket, England, IPL 2021

    पुढील बातम्या