मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 मध्ये पहिल्यांदा खेळणार वर्ल्ड चॅम्पियन लेग स्पीनर, अनिल कुंबळेने दिली संधी

IPL 2021 मध्ये पहिल्यांदा खेळणार वर्ल्ड चॅम्पियन लेग स्पीनर, अनिल कुंबळेने दिली संधी

पंजाब किंग्ज टीमने इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीद (Adil Rashid) याला निवडलं आहे. पंजाबचा कोच अनिल कुंबळेने (Anil Kumble) ही निवड करून आदिलला आयपीएल पदार्पणाची संधी दिली आहे.

पंजाब किंग्ज टीमने इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीद (Adil Rashid) याला निवडलं आहे. पंजाबचा कोच अनिल कुंबळेने (Anil Kumble) ही निवड करून आदिलला आयपीएल पदार्पणाची संधी दिली आहे.

पंजाब किंग्ज टीमने इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीद (Adil Rashid) याला निवडलं आहे. पंजाबचा कोच अनिल कुंबळेने (Anil Kumble) ही निवड करून आदिलला आयपीएल पदार्पणाची संधी दिली आहे.

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) टी-20 क्रिकेट स्पर्धेतील 2021 चे  उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबर 2021 ते 15 ऑक्टोबर 2021 यादरम्यान यूएईमध्ये खेळवले जाणार आहेत. त्यासाठी सगळ्याच टीम आता कंबर कसत आहेत. कारण आयपीएलचं विजेतेपद पटकावण्यासाठी सर्वच संघ मेहनत घेत आहेत. अगदी आता टीममध्ये खेळाडूंची अदलाबदल करायला सुरुवात झाली आहे. दरम्यान पंजाब किंग्ज टीमने इंग्लंडचा लेग स्पिनर आदिल रशीद (Adil Rashid) याला निवडलं आहे. पंजाबचा कोच अनिल कुंबळेने (Anil Kumble) ही निवड करून आदिलला आयपीएल पदार्पणाची संधी दिली आहे. आपल्या गुगलीने जगभरातील बॅट्समनना चकवणारा आदिल या वर्षी पहिल्यांदाच आयपीएल खेळणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी 2021 आयपीएलच्या लिलावात आदिल रशीदला कुणीच विकत घेतलं नव्हतं त्यामुळे इंग्लंडच्या माजी खेळाडूंनाही आश्चर्य वाटलं होतं. पंजाब किंग्जने झाय रिचर्डसनच्याजागी आदिलची निवड केली आहे. हे वाचा-वर्ल्ड कप विजेत्या भारतीय कोचवर आरोप, आंतरराष्ट्रीय खेळाडूने सोडलं क्रिकेट आदिलसोबतच ऑस्ट्रेलियाचा पेस बॉलर नॅथन ॲलिसही आता पंजाबकडून खेळणार आहे. त्याला रिली मेरिडिथच्याऐवजी संघात जागा मिळाली आहे. नॅथन नवी गोलंदाज आहे. रशीद टी-20 च्या जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. 2019 वर्ल्ड कपमध्ये 11 विकेट्स घेत इंग्लंडला विजेतेपद मिळवून देण्यामध्ये आदिलने महत्त्वाची भूमिका बजावली होती. असं आहे आदिलचं करिअर 33 वर्षांच्या आदिल रशीदने टी-20 क्रिकेटमध्ये 65 तर वन-डेमध्ये 159 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने इंग्लंडसाठी 19 टेस्ट मॅच खेळल्या असून त्याने 60 विकेट्स घेतल्या आहेत. आतापर्यंत आदिलने 201 टी-20 सामने खेळले आहेत. टी-20 ब्लास्टमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यानी आतापर्यंत एकूण 232 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट (Economy Rate) 7.43 होता. रशीदला अनुभव तर आहेच पण सध्या तो फॉर्मातही आहे. पंजाब किंग्ज टीममध्ये मुरुगन अश्विन आणि रवी विष्णोई हे लेग स्पिनर्स आहेतच. त्यांच्यातच आता रशीदचा समावेश झाला आहे. तिघं मिळून पंजाबला चांगली कामगिरी करायला मदत करतील. आदिलचे मित्र डेव्हिड मलान आणि ख्रिस जॉर्डनही पंजाब संघातून खेळतात. हे वाचा-भारत-पाक महामुकाबल्याआधी पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलं BCCI ला कॉपी या वर्षीचा आयपीएल सिझन सुरू झाला होता पण भारतात झालेल्या या स्पर्धेत बायोबबलमध्ये राहूनही खेळाडूंना कोविड-19 ची बाधा होत होती त्यामुळे 4 मे 2021 ला ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. तोपर्यंत पंजाब किंग्जने 8 सामने खेळून 6 गुण मिळवले होते आणि गुणतक्त्यात टीम सहाव्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स तर दुसऱ्या स्थानी महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्ज ही टीम आहे. या नव्या लेग स्पिनरचा पंजाब संघाला कसा फायदा होतो हे लवकरच कळेल.
First published:

Tags: IPL 2021

पुढील बातम्या