मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : एलन मस्कचं ट्वीट, मॅक्सवेलचं धमाकेदार अर्धशतक, अजब योगायोग आणि Memes चा पूर!

IPL 2021 : एलन मस्कचं ट्वीट, मॅक्सवेलचं धमाकेदार अर्धशतक, अजब योगायोग आणि Memes चा पूर!

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. जगप्रसिद्ध उद्योजक एलन मस्क (Elon Musk) यांनी मॅक्सवेलचं नाव घेऊन एक ट्वीट केलं. यानंतर यूजर्सनी मस्क यांच्या या ट्वीटचा संदर्भ ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीशी लावला.

पुढे वाचा ...

मुंबई, 30 सप्टेंबर : ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2021) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये (RCB vs RR) 150 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मॅक्सवेल चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला. टीम अडचणीत असताना त्याने 30 बॉलमध्ये 50 रनची खेळी केली आणि बँगलोरला 17.1 ओव्हरमध्येच जिंकवून दिलं. मॅक्सवेल याने ही अफलातून खेळी केली असली तरी सोशल मीडियावर मात्र एक वेगळाच योगायोग पाहायला मिळाला. जगप्रसिद्ध उद्योजक एलन मस्क (Elon Musk) यांनी मॅक्सवेलचं नाव घेऊन एक ट्वीट केलं. यानंतर यूजर्सनी मस्क यांच्या या ट्वीटचा संदर्भ ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीशी लावला.

एलन मस्क यांनी लोकप्रिय भौतिकशास्त्रज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल (James Clerk Maxwell) यांच्याबद्दलच्या एका ट्वीटवर प्रतिक्रिया दिली. मॅक्सवेल अविश्वसनीय होते, असं मस्क म्हणाले. मस्क यांच्या या कमेंटनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात ग्लेन मॅक्सवेलने 11 सामन्यांमध्ये 350 रन केले आणि तीन विकेटही घेतल्या आहेत. विराट कोहलीनेही मॅक्सवेलचा वापर योग्य पद्धतीने केला. आयपीएलच्या मागच्या मोसमात पंजाबकडून खेळताना मॅक्सवेलला एकही बाऊंड्री मारण्यात अपयश येत होतं, पण यंदा मात्र त्याचं नशीब पूर्णपणे बदलून गेलं आहे.

ग्लेन मॅक्सवेल याच्या या फॉर्ममुळे आरसीबीचा प्ले-ऑफमध्ये जायचा मार्गही सोपा झाला आहे. 11 मॅचमध्ये 7 विजय आणि 4 पराभवांसह विराटची टीम पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. बँगलोरच्या खात्यात सध्या 14 पॉईंट्स असल्यामुळे त्यांना प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी उरलेल्या तीन मॅचमध्ये एक विजयही पुरेसा ठरू शकतो.

First published:

Tags: Elon musk, Glenn maxwell, IPL 2021, RCB