• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : विराट मावीवर तुटून पडला, एका बॉलमध्येच काढले 9 रन

IPL 2021 : विराट मावीवर तुटून पडला, एका बॉलमध्येच काढले 9 रन

आयपीएल 2021 च्या एलिमिनेटरमध्ये (IPL 2021 Eliminator) आरसीबीचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (RCB vs KKR) आहे. या मॅचमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.

 • Share this:
  शारजाह, 11 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या एलिमिनेटरमध्ये (IPL 2021 Eliminator) आरसीबीचा सामना कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (RCB vs KKR) आहे. या मॅचमध्ये आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर विराट आणि देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांमध्ये 5.1 ओव्हरमध्ये 49 रनची पार्टनरशीप झाली. मॅचच्या दुसऱ्या ओव्हरपासूनच विराट कोहलीने कोलकात्यावर आक्रमण करायला सुरुवात केली. शिवम मावीच्या (Shivam Mavi) अखेरच्या बॉलवर विराटने तब्बल 9 रन काढले. दुसऱ्या ओव्हरचा अखेरचा मावीने टाकलेला बॉल नो बॉल होता. या बॉलला विराटने फोर मारली, त्यामुळे आरसीबीला एकूण 5 रन आणि पुढच्या बॉलला फ्री हिट मिळाला. फ्री हिटच्या या बॉलवर विराटने पुन्हा एक फोर मारली, त्यामुळे या एकाच बॉलमध्ये आरसीबीला 9 रन मिळाल्या. 33 बॉलमध्ये 39 रन करून विराट आऊट झाला. सुनिल नारायणने विराटला बोल्ड केलं. या सामन्यात बँगलोर आणि कोलकात्याने (RCB vs KKR) त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. आयपीएल लीग स्टेजमध्ये आरसीबी तिसऱ्या आणि कोलकाता चौथ्या क्रमांकावर राहिली. आरसीबी आणि केकेआर यांच्यातल्या एलिमिनेटरमध्ये पराभूत झालेल्या टीमचं आव्हान संपुष्टात येईल, तर जी टीम विजयी होईल त्यांना दिल्लीविरुद्ध क्वालिफायर-2 चा सामना खेळावा लागेल. त्या सामन्यात ज्यांचा विजय होईल ती टीम फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळेल. विराट कॅप्टन्सी सोडणार यंदाच्या आयपीएलनंतर आपण आरसीबीची कॅप्टन्सी सोडणार आहोत, असं विराटने आधीच स्पष्ट केलं आहे. कॅप्टन्सी सोडणार असलो तरी आपण शेवटपर्यंत आरसीबीकडूनच खेळणार असल्याचं विराटने सांगितलं आहे. कोलकात्याच्याविरुद्धच्या सामन्यात जर आरसीबीचा पराभव झाला तर विराटसाठी कॅप्टन म्हणून ही अखेरची आयपीएल मॅच ठरेल. आयपीएल इतिहासामध्ये आरसीबीला अजून एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही, त्यामुळे कॅप्टन म्हणून आपल्या अखेरच्या मोसमात चॅम्पियनशीपचा दुष्काळ दूर करण्याचा विराटचा प्रयत्न असेल. आरसीबीची टीम विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, श्रीकर भरत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, डॅनियल ख्रिश्चन, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल कोलकात्याची टीम शुभमन गिल, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, इयन मॉर्गन, दिनेश कार्तिक, शाकीब अल हसन, सुनिल नारायण, लॉकी फर्ग्युसन, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती
  Published by:Shreyas
  First published: