• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 Eliminator : नारायणच्या तडाख्यामुळे RCB बाहेर, विराटच्या कॅप्टन्सीचा शेवट कडू!

IPL 2021 Eliminator : नारायणच्या तडाख्यामुळे RCB बाहेर, विराटच्या कॅप्टन्सीचा शेवट कडू!

आयपीएल 2021 च्या एलिमिनेटरमध्ये (IPL 2021 Eliminator) सुनिल नारायणने (Sunil Narine) दिलेल्या तडाख्यामुळे आरसीबीचा (RCB vs KKR) एलिमिनेटर सामन्यात पराभव झाला आहे.

 • Share this:
  शारजाह, 11 ऑक्टोबर : आयपीएल 2021 च्या एलिमिनेटरमध्ये (IPL 2021 Eliminator) सुनिल नारायणने (Sunil Narine) दिलेल्या तडाख्यामुळे आरसीबीचा (RCB vs KKR) एलिमिनेटर सामन्यात पराभव झाला आहे. पहिले 4 विकेट घेतल्यानंतर सुनिल नारायणने 15 बॉलमध्ये 26 रनची महत्त्वाची खेळी केली. बँगलोरने दिलेल्या 139 रनच्या आव्हानाचा पाठलाग कोलकात्याने 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून पूर्ण केला. शुभमन गिलने 29, व्यंकटेश अय्यर आणि नारायणने 26 तर नितीश राणाने 23 रनची खेळी केली. बँगलोरकडून मोहम्मद सिराज, हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर बँगलोरला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून फक्त 138 रनच करता आले. सुनिल नारायणने 4 ओव्हरमध्ये 21 रन देऊन 4 विकेट घेतल्या. नारायणने विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल या दिग्गजांसह श्रीकर भरतला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. लॉकी फर्ग्युसनलाही 2 विकेट घेण्यात यश आलं. बँगलोरकडून विराट कोहलीने सर्वाधिक 39 रन केले, तर देवदत्त पडिक्कल 21 रन करून आऊट झाला. या सामन्यात बँगलोर आणि कोलकात्याने (RCB vs KKR) त्यांच्या टीममध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे टॉस जिंकल्यानंतर आपण बॉलिंग घेणार होतो, असं कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गन याने सांगितलं. आयपीएल लीग स्टेजमध्ये आरसीबी तिसऱ्या आणि कोलकाता चौथ्या क्रमांकावर राहिली. कोलकात्याविरुद्धच्या या पराभवानंतर आरसीबीची टीम आयपीएलमधून बाहेर गेली आहे. तर कोलकात्याला आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध क्वालिफायर-2 ची मॅच खेळावी लागणार आहे. कोलकाता दिल्ली यांच्यातली विजेती टीम चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आयपीएल फायनल खेळेल. पहिल्या क्वालिफायरमध्ये चेन्नईने दिल्लीचा पराभव केला, त्यामुळे दिल्लीची टीम थेट प्ले-ऑफमध्ये पोहोचली.
  Published by:Shreyas
  First published: