• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • IPL RCB vs KKR Live Score:'चक्रवर्ती'च्या वादळात विराट सेना भुईसपाट, अवघ्या 92 धावांवर ऑलआऊट

IPL RCB vs KKR Live Score:'चक्रवर्ती'च्या वादळात विराट सेना भुईसपाट, अवघ्या 92 धावांवर ऑलआऊट

 वरुण चक्रवर्तीच्या भेदक माऱ्यापुढे रॉयल चॅलेंजर्सचा संघ्या अवघ्या 92 धावांवर गारद झाला आहे.

वरुण चक्रवर्तीच्या भेदक माऱ्यापुढे रॉयल चॅलेंजर्सचा संघ्या अवघ्या 92 धावांवर गारद झाला आहे.

वरुण चक्रवर्तीच्या भेदक माऱ्यापुढे रॉयल चॅलेंजर्सचा संघ्या अवघ्या 92 धावांवर गारद झाला आहे.

  • Share this:
    दुबई, 20 सप्टेंबर : दुबईमध्ये (dubai) सुरू असलेल्या आयपीएलच्या (ipl 2021) दुसऱ्या हंगामात आज दुसऱ्या दिवशी कोलकाता नाइटरायडर्स (kkr) आणि रॉयल चैलेंजर्स बंगळुरु (rcb) यांच्यात रंजक सामना रंगला आहे.  वरुण चक्रवर्तीच्या (varun chakravarthy) भेदक माऱ्यापुढे रॉयल चॅलेंजर्सचा संघ्या अवघ्या 92 धावांवर गारद झाला आहे. कोलकाता नाइटराइडर्सच्या विरोधात विराट कोहलीच्या (virat kohali) टीमची चांगलीच धुळधान उडाली आहे. संपूर्ण टीम अवघ्या  92 रन्सवर ऑल आउट झाली आहे. केकेआरकडून  वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येक तीन विकेट घेऊन रॉयल चॅलेंजरला भगदाड पाडले. तर  फास्टर बॉलर कृष्णाने विराट कोहलीला आऊट केलं. IPL 2021: RCB च्या खेळाडूंनी घातली निळी जर्सी, कारण वाचून वाढेल आदर आयपीएलमध्ये 200 वा सामना खेळणाऱ्या विराटने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण, त्याचा हा निर्णय घातक ठरला. ओपनिंग आलेली जोडी झटपट बाद झाली. विराट फक्त 5 धावा करून माघारी परतला. त्यानंतर आरसीबीची कमान देवदत्त पडिक्कलने सांभाळली खरी पण तोही सर्वाधिक 22 रन्स करून बाद झाला. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 40,000 रुपये पगाराची नोकरी; लगेच करा अर्ज त्यानंतर पहिलाच सामना खेळणाऱ्या  केएस भरतने 16 रन्स केले.  आरसीबी के बल्लेबाज एबी डिविलियर्स आणि हसारंगा गोल्डन  भोपळाही फोडू शकले नाही.  मॅक्सवेल 17 धावांवर 10 रन्स करून बाद झाला.
    Published by:sachin Salve
    First published: