IPL 2021 : धोनी रिव्ह्यू सिस्टीम, थर्ड अंपायरकडेही जायची गरज नाही, माहीने पुन्हा सिद्ध केलं

IPL 2021 : धोनी रिव्ह्यू सिस्टीम, थर्ड अंपायरकडेही जायची गरज नाही, माहीने पुन्हा सिद्ध केलं

डीआरएस म्हणजे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम (DRS) नाही तर धोनी रिव्ह्यू सिस्टीम असं अनेकवेळा म्हणलं जातं, कारण डीआरएसबाबतचा धोनीचा (MS Dhoni) निर्णय कधीच चुकत नाही. आयपीएलच्या (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्स आणि पंजाब किंग्स (CSK vs Punjab Kings) यांच्यातल्या सामन्यातही याचा प्रत्यय आला.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : डीआरएस म्हणजे डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम (DRS) नाही तर धोनी रिव्ह्यू सिस्टीम असं अनेकवेळा म्हणलं जातं, कारण डीआरएसबाबतचा धोनीचा (MS Dhoni) निर्णय कधीच चुकत नाही. आयपीएलच्या (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्स आणि पंजाब किंग्स (CSK vs Punjab Kings) यांच्यातल्या सामन्यातही याचा प्रत्यय आला. मॅचच्या पाचवी ओव्हर सुरू असताना दीपक चहरने (Deepak Chahar) दुसऱ्या बॉलला गेलला (Chris Gayle) तर चौथ्या बॉलला निकोलस पूरनला (Nicholas Pooran) माघारी पाठवलं. यानंतर पाचव्या बॉलला शाहरुख खान (Shahrukh Khan) मैदानात आला, तेव्हा चहरचा बॉल शाहरुखच्या पॅडला लागला, यानंतर दीपक चहरने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं, पण अंपायरने नॉट आऊट दिलं.

अंपायरने नॉट आऊट दिल्यामुळे दीपक चहरने धोनीकडे डीआरएस घेण्यासाठी आग्रह केला, पण धोनीने मात्र यासाठी नकार दिला. रिप्ले बघितल्यानंतर धोनीचा निर्णय पुन्हा एकदा बरोबर आल्याचं दिसून आलं, कारण बॉलचा इम्पॅक्ट ऑफ स्टम्पच्या बाहेर होता.

दीपक चहरने या सामन्यात पंजाबच्या बॅटिंगला एकामागोमाग एक धक्के दिले. 4 ओव्हरमध्ये 13 रन देऊन चहरने पंजाबच्या 4 विकेट घेतल्या. मयंक अग्रवाल, क्रिस गेल, दीपक हुडा आणि निकोलस पूरन या पंजाबच्या महत्त्वाच्या बॅट्समनना माघारी पाठवलं.

Published by: Shreyas
First published: April 16, 2021, 8:38 PM IST

ताज्या बातम्या