Home /News /sport /

IPL 2021 : जडेजा हर्षा भोगलेंना म्हणाला, 'मला त्या नावाने बोलू नका'

IPL 2021 : जडेजा हर्षा भोगलेंना म्हणाला, 'मला त्या नावाने बोलू नका'

IPL 2021 रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) पर्पल कॅप मिळवलेल्या बँगलोरच्या हर्षल पटेलच्या (Harshal Patel) एका ओव्हरमध्ये 37 रन ठोकले. जडेजाच्या या खेळीचं क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी कौतुक केलं.

    मुंबई, 5 मे: आयपीएलचा यंदाचा मोसम (IPL 2021) अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला आहे. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयला हा निर्णय घ्यावा लागला. केकेआरचे दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), संदीप वॉरियर (Sandeep Warrier) तसंच दिल्लीचा अमित मिश्रा (Amit Mishra), हैदराबादचा ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. चेन्नई सुपरकिंग्सचा बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipathi Balaji) आणि प्रशिक्षक माईक हसी (Mike Hussey) यांनाही कोरोनाची लागण झाली, त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात कायरन पोलार्ड (Kieron Pollard) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी केलेल्या वादळी खेळी क्रिकेट रसिकांच्या कायमच लक्षात राहतील. जडेजाने पर्पल कॅप मिळवलेल्या बँगलोरच्या हर्षल पटेलच्या (Harshal Patel) एका ओव्हरमध्ये 37 रन ठोकले. जडेजाच्या या खेळीचं क्रिकेट समालोचक हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी कौतुक केलं. क्रिकबझवर बोलताना हर्षा भोगले म्हणाले, 'मोसमात ऑलराऊंड कामगिरी कोणी केली असेल, तर समोर एकच नाव येतं, ते म्हणजे सर रविंद्र जडेजा. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने 37 रन काढले, तसंच 13 रन देऊन 3 विकेटही घेतल्या. यामध्ये मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्स यांचा समावेश आहे. तसंच त्याने रन आऊटही केला. एक व्यक्ती जर हे सगळं करत असेल, तर आश्चर्य वाटतं.' हर्षा भोगलेंच्या या कौतुकावर रविंद्र जडेजाने प्रतिक्रिया दिली. 'धन्यवाद हर्षा भोगले. पण तुम्ही मला सर रविंद्र जडेजाऐवजी नुसतं जडेजा म्हणलं असतं, तर मी जास्त खूश झालो असतो,' असं जडेजा म्हणाला. यावर हर्षा भोगलेंनीही डन, असाच खेळत राहा, चियर्स... असी प्रतिक्रिया दिली. रविंद्र जडेजाच्या या भेदक कामगिरीच्या जोरावर चेन्नईने बँगलोरचा पराभव केला. हर्षल पटलेला 37 रन मारताच जडेजाने आयपीएल इतिहासात एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन करण्याच्या विक्रमाचीही बरोबरी केली. या सामन्यात जडेजाने 28 बॉलमध्ये 62 रनची खेळी केली. यानंतर बॉलिंगमध्येही त्याने मॅक्सवेल आणि एबी डिव्हिलियर्सची विकेट घेतली. जडेजाच्या या ऑलराऊंड कामगिरीमुळे चेन्नईने बँगलोरचा 69 रनने पराभव केला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, Csk, IPL 2021, Ravindra jadeja

    पुढील बातम्या