IPL 2021 : हा खेळाडू लवकरच 'टीम इंडिया'मध्ये दिसेल, गावसकरांची मोठी भविष्यवाणी

IPL 2021 : हा खेळाडू लवकरच 'टीम इंडिया'मध्ये दिसेल, गावसकरांची मोठी भविष्यवाणी

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) अनेक नवोदित खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) ओपनर देवदत्त पडिक्कलदेखील (Devdutt Padikkal) त्यातलाच एक.

  • Share this:

मुंबई, 23 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) अनेक नवोदित खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा (RCB) ओपनर देवदत्त पडिक्कलदेखील (Devdutt Padikkal) त्यातलाच एक. राजस्थानविरुद्धच्या (Rajasthan Royals) मॅचमध्ये पडिक्कलने नाबाद 101 रनची खेळी केली. देवदत्तच्या या कामगिरीचं महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर (Sunil Gavaskar) यांनी कौतुक केलं आहे. देवदत्त पडिक्कल लवकरच भारताकडून (Team India) खेळताना दिसेल, असं भाकीत गावसकर यांनी केलं. पडिक्कल भविष्यात भारताकडून खेळला तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही, अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. पडिक्कलने आयपीएलबरोबरच प्रथम श्रेणी आणि रणजी ट्रॉफीमध्ये खूप रन केले आहेत. गावसकर स्टार स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात बोलत होते.

'कर्नाटकने नेहमीच चांगले बॅट्समन दिले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ, राहुल द्रविड आणि केएल राहुल ही उदाहरण आपल्यासमोर आहेत. करुण नायरने टेस्ट क्रिकेटमध्ये त्रिशतक केलं आहे, याशिवाय मयंक अग्रवालही आहे. आता या यादीत पडिक्कलचाही समावेश होऊ शकतो,' असं गावसकरांना वाटतंय.

विराटनेही केलं पडिक्कलचं कौतुक

पडिक्कलने गुरूवारी राजस्थानविरुद्ध 52 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले होते. त्याच्या या खेळीमुळे बँगलोरने 178 रनचं आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. पडिक्कलच्या या खेळीमध्ये 11 फोर आणि 6 सिक्सचाही समावेश होता. पडिक्कलच्या या शतकी खेळीमध्ये 80 रन फोर आणि सिक्सच्या माध्यमातूनच आल्या होत्या. पडिक्कलची ही खेळी पाहून बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीही (Virat Kohli) प्रभावित झाला. पडिक्कल शानदार खेळाडू असून भविष्यात तो आणखी चांगली कामगिरी करेल, असा विश्वास विराटने व्यक्त केला.

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाल्यानंतर शतकापेक्षा आपल्याला टीमचा विजय जास्त महत्त्वाचा वाटत असल्याचं पडिक्कल म्हणाला. 'माझ्यासाठी हे शतक खास होतं, जेव्हा मी कोरोना पॉझिटिव्ह झालो, तेव्हा मला फक्त इकडे येऊन खेळायचं होतं. मला मैदानात उतरता येत नव्हतं, याची खंत मला वाटत होती. शतकाजवळ पोहोचल्यानंतर मी तणावात नव्हतो, विराटने मला मॅच संपवायला सांगितलं,' असं वक्तव्य पडिक्कलने केलं.

आयपीएलच्या मागच्या मोसमातून पडिक्कलने पदार्पण केलं होतं. पहिल्याच मोसमात पडिक्कल आरसीबीकडून सर्वाधिक रन करणारा खेळाडू ठरला. 15 सामन्यांमध्ये त्याने 124 चा स्ट्राईक रेटने 473 रन केले. या मोसमात पडिक्कलने तीन सामन्यांमध्ये 68.50 च्या सरासरीने 137 रन केले आहेत.

Published by: Shreyas
First published: April 23, 2021, 6:56 PM IST

ताज्या बातम्या