मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 : कुटुंबाची मदत करण्यासाठी सोडलं होतं क्रिकेट, आज आयपीएलमध्ये पदार्पण

IPL 2021 : कुटुंबाची मदत करण्यासाठी सोडलं होतं क्रिकेट, आज आयपीएलमध्ये पदार्पण

 आयपीएलमुळे (IPL) अनेक नवोदितांना जगासमोर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळतं. दिल्ली आणि पंजाब (Delhi Capitals vs Punjab Kings) यांच्यात झालेल्या सामन्यात लुकमान मेरिवाला (Lukman Meriwala) यालाही अशीच संधी मिळाली.

मुंबई, 18 एप्रिल : आयपीएलमुळे (IPL) अनेक नवोदितांना जगासमोर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ मिळतं. दिल्ली आणि पंजाब (Delhi Capitals vs Punjab Kings) यांच्यात झालेल्या सामन्यात लुकमान मेरिवाला (Lukman Meriwala) यालाही अशीच संधी मिळाली. लुकमानने या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं, पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सने लुकमानला लिलावात 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. करियरच्या सुरुवातीला त्याला खेळण्याची फार संधी मिळाली नाही, त्यामुळे त्याने क्रिकेट सोडून आई-वडिलांना मदत करण्याचं ठरवलं, पण आई-वडिलांनी आग्रह केल्यामुळे लुकमान पुन्हा एकदा मैदानात उतरला, यानंतर त्याने मागे वळून बघितलं नाही.

लुकमान मेरिवाला बडोद्याकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने क्रिकेट खेळणं सोडून दिलं होतं. 'माझे वडील छोटे शेतकरी होते. पाच जणांच्या कुटुंबात घर चालवणं कठीण होतं, त्यामुळे मी क्रिकेट सोडलं आणि फॅब्रिकेशनच्या कामाला सुरुवात केली, त्यामुळे घरच्यांनाही मदत मिळायला लागली, पण आई-वडिलांनी खेळाकडे लक्ष द्यायला सांगितलं. काकांनीही मला मदत केली,' असं लुकमान म्हणाला.

कुटुंबाने पाठिंबा दिल्यानंतर मी क्रिकेटकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. बडोद्याच्या अंडर-19 टीममध्ये मला जागा मिळाली. यानंतर वनडे टीममध्येही मला जागा मिळाली. 2013-14 मध्ये मेरिवाला टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर होता. 2017 साली त्याने रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आयपीएलमध्ये इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि उमेश यादव (Umesh Yadav) यांच्याकडून शिकायचं असल्याची इच्छा लुकमानने व्यक्त केली. तसंच नेटमध्ये मोठ्या बॅट्समनसमोर स्वत:ची कमजोरी दूर करण्याचा प्रयत्न करेन, असं लुकमानने सांगितलं.

लुकमानने टी-20 करियरमध्ये 44 सामने खेळून 15 च्या सरासरीने 72 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 7 पेक्षा कमी आहे, तर स्ट्राईक रेट 13 चा आहे. लुकमानने एकदा 4 विकेट आणि 3 वेळा 5 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यातही त्याने चांगली सुरुवात केली. पंजाबच्या मयंक अग्रवालला त्याने आऊट केलं.

First published:
top videos

    Tags: Cricket, Delhi capitals, IPL 2021