Home /News /sport /

श्रेयस अय्यरवर 8 एप्रिलला शस्त्रक्रिया, एवढ्या काळासाठी मैदानाबाहेर

श्रेयस अय्यरवर 8 एप्रिलला शस्त्रक्रिया, एवढ्या काळासाठी मैदानाबाहेर

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्याची शस्त्रक्रिया 8 एप्रिलला होणार आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पुण्यात झालेल्या पहिल्या वनडेमध्ये फिल्डिंग कताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती.

पुढे वाचा ...
    मुंबई, 30 मार्च : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) खांद्याची शस्त्रक्रिया 8 एप्रिलला होणार आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात पुण्यात झालेल्या पहिल्या वनडेमध्ये फिल्डिंग कताना श्रेयस अय्यरला दुखापत झाली होती. फोर अडवताना तो खांद्यावर पडला होता. दुखापत गंभीर असल्यामुळे अय्यर सीरिजमधून बाहेर झाला होता. डॉक्टरांच्या तपासणीनंतर शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचं समोर आलं. श्रेयस अय्यरला दुखापत झाल्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान आयपीएलच्या (IPL 2021) दिल्ली कॅपिटल्सचं झालं आहे. 9 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी श्रेयस अय्यर उपलब्ध नसेल. स्पोर्ट्स टुडेच्या वृत्तानुसार शस्त्रक्रियेनंतर श्रेयस अय्यर कमीत कमी चार ते पाच महिने क्रिकेटपासून लांब राहू शकतो, त्यामुळे फक्त आयपीएलच नाही तर त्याला टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यातूनही मुकावं लागू शकतं. सप्टेंबर महिन्यात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध टी-20 सीरिज खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. या सीरिजमध्येही श्रेयस अय्यरच्या खेळण्यावर शंका आहे. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीमध्ये दिल्ली कॅपिटल्ससमोर कर्णधार शोधण्याचं आव्हान असेल. दिल्लीकडे शिखर धवन (Shikhar Dhawan), आर अश्विन (R Ashwin), ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि स्टीव स्मिथ (Steve Smith) हे खेळाडू कर्णधारपदासाठीचे पर्याय असतील. दिल्ली कॅपिटल्सची टीम श्रेयसच्या नेतृत्वात मागच्या आयपीएलच्या फायनलला पोहोचली होती, पण अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने त्यांचा पराभव केला होता. फायनलमध्ये श्रेयस अय्यरने नाबाद 65 रन तर ऋषभ पंतने 56 रन केले होते.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Delhi capitals, India vs england, IPL 2021, Shreyas iyer

    पुढील बातम्या