Home /News /sport /

IPL 2021 : कृणाल पांड्यासोबतच्या वादामुळे टीममधून निलंबन, धडाकेबाज अर्धशतक करत कमबॅक

IPL 2021 : कृणाल पांड्यासोबतच्या वादामुळे टीममधून निलंबन, धडाकेबाज अर्धशतक करत कमबॅक

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings vs Rajasthan Royals) पहिले बॅटिंग करत 221 रन केले. केएल राहुलने (KL Rahul) 50 बॉलमध्ये 91 आणि दीपक हुडाने (Deepak Hooda) 28 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली.

    मुंबई, 12 एप्रिल : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings vs Rajasthan Royals) पहिले बॅटिंग करत 221 रन केले. केएल राहुलने (KL Rahul) 50 बॉलमध्ये 91 आणि दीपक हुडाने (Deepak Hooda) 28 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली. दीपक हुडाने 228.57 च्या स्ट्राईक रेटने 6 सिक्स आणि 4 फोर मारले. वर्षभरासाठी स्थानिक क्रिकेटमधून निलंबन झाल्यानंतर दीपक हुडाची ही पहिलीच मॅच होती. वर्षाच्या सुरूवातीलाच दीपक हुडा आणि कृणाल पांड्या (Krunal Pandya) यांच्यात वाद झाला होता, त्यामुळे दीपक हुडाने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतून माघार घेतली, पुढे बडोदा क्रिकेट असोसिएशनने हुडावर कारवाई केली आणि त्याचं संपूर्ण मोसमासाठी निलंबन केलं. काय झाला वाद? बडोदा टीमचा उपकर्णधार दीपक हुडाने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतून माघार घेतली होती. बडोद्याचा कर्णधार कृणाल पांड्या (Krunal Pandya)सोबत भांडण झाल्यामुळे हुडाने सय्यद मुश्ताक अलीमधून माघार घ्यायचा निर्णय घेतला. कृणाल पांड्याने आपल्याला शिव्या दिल्या, त्यामुळे आपण स्पर्धेतून माघार घेत आहोत, असा आरोप दीपक हुड्डाने केला. कृणाल पांड्याने आपल्याला सरावापासून रोखलं आणि आपल्यासोबत गैरवर्तणूक केली, असा दावा दीपक हुडाने केला. याबाबत त्याने बडोदा क्रिकेट असोसिएशनला ई-मेलही लिहिला, ज्यात त्याने कृणाल पांड्याबाबत तक्रार केली. कृणाल पांड्याने शिव्या दिल्यामुळे आपण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून माघार घेत असल्याचं त्याने मेलमध्ये लिहिलं. हुडा हा बडोद्याचा अनुभवी खेळाडू आहे. त्याने बडोद्यासाठी 46 प्रथम श्रेणी, 68 लिस्ट ए मॅच आणि 123 टी-20 मॅच खेळल्या आहेत. मागच्या मोसमात हुडाचा विक्रम आयपीएलच्या मागच्या मोसमातही दीपक हुडाने विक्रम केला होता. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात त्याने 30 बॉलमध्ये नाबाद 62 रन केले. 68 आयपीएल मॅच खेळणाऱ्या दीपक हुडाचं हे दुसरं अर्धशतक होतं. 5 वर्षानंतर त्याने दुसरं अर्धशतक केलं होतं. आयपीएलच्या मागच्या मोसमात केलेल्या अर्धशतकाआधी त्याने 2015 साली 50 रनचा टप्पा गाठला होता. दुसरं अर्धशतक करायला त्याल 48 इनिंग लागल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक इनिंगनंतर अर्धशतक करण्याचा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर आहे. युसूफने 49 इनिंगनंतर अर्धशतक केलं होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021, Punjab kings

    पुढील बातम्या