IPL 2021: शमीचे आशीर्वाद घेत त्याच्याच टीमचा उडवला धुव्वा! दीपक चहर ठरला पंजाबसाठी डोकेदुखी

IPL 2021: शमीचे आशीर्वाद घेत त्याच्याच टीमचा उडवला धुव्वा! दीपक चहर ठरला पंजाबसाठी डोकेदुखी

IPL 2021, CSK vs PBKS: चेन्नईचा वेगवाग बॉलर दीपक चहरने सामना सुरू होण्यापूर्वी पंजाबचा वेगवान बॉलर मोहम्मद शमीचे (Deepak Chahar touches Shami feet before the match) चरणस्पर्श केले आहेत. यानंतर त्याने पंजाब संघाचा धुव्वा उडवून अवघ्या 13 रनांत जवळपास निम्मा संघ गारद केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल: शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किग्स (CSK vs PBKS) यांच्यामध्ये झालेल्या आयपीएल सामन्यात एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला आहे. या सामन्यात चेन्नईचा वेगवान बॉलर दीपक चहर (Deepak Chahar) खऱ्या अर्थानं मॅच विनर ठरला आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी चहरने पंजाबचा वेगवान बॉलर मोहम्मद शमीच्या (Deepak Chahar touches Shami feet before the match) पाया पडत त्याचे आशीर्वाद घेतले आहे. यानंतर त्याने पंजाब संघाचा धुव्वा उडवून अवघ्या 13 धावा देऊन जवळपास निम्मा संघ गारद केला आहे. त्याने चेन्नईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला आहे. पण चहरचा शमीच्या पाया पडतानाचा हा फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी या फोटोचं कौतुक केलं आहे.

या सामन्यात दीपक चहरने आपल्या वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला चांगलचं मेटाकुटीला आणलं. दरम्यान त्याने 4 ओव्हरमध्ये अवघ्या 13 धावा देत, चार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. चहरने मयांक अग्रवाल (0), क्रिस गेल (10), निकोलस पूरन (0) आणि दीपक हुडा (10) यांना स्वस्तात बाद केलं आहे. दीपक चहरची हा आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली आहे. या सामान्यात चहरने एक मेडन ओव्हर देखील टाकली आहे.

या सामन्यात पंजाबकडून फक्त शाहरुख खानला (Shahrukh Khan) चांगली कामगिरी करता आली आहे. त्याने 36 बॉलमध्ये 47 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 2 सिक्स आणि 4 फोर लगावले आहेत. त्याच्याव्यतिरिक्त झाय रिचर्डसन (15) वगळता कोणालाही 10 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. परिणामी पंजाबने 20 षटकांत 8 गड्यांच्या बदल्यात अवघ्या 106 धावा केल्या.

हे ही वाचा-पंजाबला हरवल्यानंतर धोनी म्हणाला, 'मला म्हातारा झाल्यासारखं वाटतंय', पाहा VIDEO

पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना, चेन्नईने 4 विकेट्सच्या बदल्यात 15.4 ओव्हरमध्येच विजयाला गवसणी घातली. सीएसकेकडून मोईन अलीने सर्वाधिक 46 धावा केल्या तर फाफ डू प्लेसिसने 36 धावांची नाबाद खेळी साकारली. ऋतुराज गायकवाड आणि सुरेश रैनाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांनी अनुक्रमे 5 आणि 8 धावा केल्या आहेत. तर पंजाबकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या आहेत.

Published by: News18 Desk
First published: April 17, 2021, 11:57 AM IST

ताज्या बातम्या