मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : धोनीच्या सांगण्यावरून दीपक चहरने बदलला गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याचा प्लान, नाही तर...

IPL 2021 : धोनीच्या सांगण्यावरून दीपक चहरने बदलला गर्लफ्रेंडला प्रपोज करण्याचा प्लान, नाही तर...

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) स्टार बॉलर दीपक चहरने (Deepak Chahar) आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 53 व्या मॅचनंतर गर्लफ्रेंड जया भारद्वाजला स्टेडियममध्येच प्रपोज केलं.

  • Published by:  Shreyas

दुबई, 10 ऑक्टोबर : चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) स्टार बॉलर दीपक चहरने (Deepak Chahar) आयपीएल 2021 (IPL 2021) च्या 53 व्या मॅचनंतर गर्लफ्रेंड जया भारद्वाजला स्टेडियममध्येच प्रपोज केलं. स्वभावाने लाजाळू असणाऱ्या दीपक चहरने पंजाब किंग्सविरुद्धच्या (CSK vs PBKS) सामन्यानंतर स्टॅण्डमध्ये जाऊन गुडघ्यावर बसून जयाला (Deepak Chahar Proposal) प्रपोज केलं आणि तिच्या बोटात अंगठी घातली. त्या मॅचदरम्यान दीपक जयाला प्रपोज करणार नव्हता, पण धोनीच्या (MS Dhoni) सांगण्यावरून त्याने आपला प्लान बदलला.

दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार दीपक जयाला प्ले-ऑफच्या सामन्यादरम्यान प्रपोज करणार होता, पण धोनीने त्याला प्ले-ऑफच्या आधीच हे करायला सांगितलं. यानंतर चहरने आपलं प्लानिंग बदललं. जया भारद्वाज दिल्लीच्या एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये काम करते. तसंच बिग बॉस सिझन 5 मधला स्पर्धक सिद्धार्थ भारद्वाजची ती बहिण आहे.

आयपीएल प्ले-ऑफमध्ये पोहोचलेल्या चेन्नईचा पंजाबविरुद्धच्या सामन्यात 6 विकेटने पराभव झाला. पहिले बॅटिंग करणाऱ्या चेन्नईने 6 विकेट गमावून 134 रन केले. या आव्हानाचा पाठलाग पंजाबने 13 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून केला. केएल राहुलने नाबाद 98 रन केले. दीपक चहरसाठी हा सामना फारसा खास नव्हता. 4 ओव्हरमध्ये 48 रन देऊन त्याने एक विकेट घेतली.

आयपीएलच्या या मोसमात त्याने 13 सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 13 विकेट घेतल्या. 13 रन देऊन 4 विकेट त्याची सर्वात्तम कामगिरी होती. 8.36 च्या इकोनॉमी रेटने त्याने बॉलिंग केली. चेन्नईकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. शार्दुल ठाकूरने या मोसमात 18 विकेट घेतल्या.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni