मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021, DC vs PBKS : राहुलचा बर्थडे हॅप्पी नाही, मोठ्या स्कोअरनंतरही पंजाबचा पराभव

IPL 2021, DC vs PBKS : राहुलचा बर्थडे हॅप्पी नाही, मोठ्या स्कोअरनंतरही पंजाबचा पराभव

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाब किंग्सचा (Delhi Capitals vs Punjab Kings) पराभव झाला आहे. पंजाबने दिलेलं 196 रनचं आव्हान दिल्लीने सहज पूर्ण केलं.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाब किंग्सचा (Delhi Capitals vs Punjab Kings) पराभव झाला आहे. पंजाबने दिलेलं 196 रनचं आव्हान दिल्लीने सहज पूर्ण केलं.

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाब किंग्सचा (Delhi Capitals vs Punjab Kings) पराभव झाला आहे. पंजाबने दिलेलं 196 रनचं आव्हान दिल्लीने सहज पूर्ण केलं.

मुंबई, 18 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाब किंग्सचा (Delhi Capitals vs Punjab Kings) पराभव झाला आहे. पंजाबने दिलेलं 196 रनचं आव्हान दिल्लीने सहज पूर्ण केलं. शिखर धवनने(Shikhar Dhawan) 49 बॉलमध्ये 92 रन केले, यामध्ये 13 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. तर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) 17 बॉलमध्ये 32 रन केले. पृथ्वीने 3 फोर आणि 2 सिक्स लगावले. मार्कस स्टॉयनिसने 13 बॉलमध्ये नाबाद 27 रन आणि ललित यादवने 6 बॉलमध्ये नाबाद 12 रन केले. पंजाबकडून जाय रिचर्डसनने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या, तर रिले मेरेडिथ आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

केएल राहुल (KL Rahul) आणि मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) यांच्या अर्धशतकांमुळे पंजाबने दिल्लीला (Punjab Kings vs Delhi Capitals) विजयासाठी 196 रनचं आव्हान दिलं. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने टॉस जिंकून पहिले पंजाबला बॅटिंगसाठी बोलावलं, यानंतर ओपनर केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी 12.4 ओव्हरमध्येच 122 रनची पार्टनरशीप केली. मयंक अग्रवाल 36 बॉलमध्ये 69 रन करुन आऊट झाला, त्याच्या या खेळीमध्ये 7 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. तर केएल राहुलने 51 बॉलमध्ये 61 रन केले, त्याने 7 फोर आणि 2 सिक्स मारले. दीपक हुडाने 13 बॉलमध्ये नाबाद 22 आणि शाहरुख खानने 5 बॉलमध्ये नाबाद 15 रन केले. दिल्लीकडून क्रिस वोक्स, मेरिवाला, रबाडा आणि आवेश खान यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाल्या.

या सामन्यात दिल्लीने सॅम करनच्याऐवजी (Sam Curran) स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) संधी दिली, तर अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) बाहेर बसवण्यात आलं. दुसरीकडे पंजाबने (Punjab Kings) मुरुगन अश्विनला (Murugan Ashwin) बाहेर ठेवून जलज सक्सेनाला (Jalaj Saxena) संधी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Cricket, Delhi capitals, IPL 2021, Kl rahul, Prithvi Shaw, Punjab kings, Shikhar dhawan