मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: पंजाबच्या खेळाडूनं चौथ्या प्रयत्नात पकडला सोपा कॅच, पाहा मजेदार फिल्डिंगचा VIDEO

IPL 2021: पंजाबच्या खेळाडूनं चौथ्या प्रयत्नात पकडला सोपा कॅच, पाहा मजेदार फिल्डिंगचा VIDEO

पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) या रविवारी झालेल्या सामन्यात दिल्लीनं 6 विकेट्सनं विजय मिळवला. या मॅचमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाला आहे.

पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) या रविवारी झालेल्या सामन्यात दिल्लीनं 6 विकेट्सनं विजय मिळवला. या मॅचमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाला आहे.

पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) या रविवारी झालेल्या सामन्यात दिल्लीनं 6 विकेट्सनं विजय मिळवला. या मॅचमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाला आहे.

  मुंबई, 19 एप्रिल : पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (PBKS vs DC) या रविवारी झालेल्या सामन्यात दिल्लीनं 6 विकेट्सनं विजय मिळवला. रविवारी झालेल्या या सामन्यात पंजाबच्या बॉलर्सना 196 रनचं संरक्षण करता आलं नाही. शिखर धवनची (Shikhar Dhawan) 49 बॉल 92 रनची खेळी हे दिल्लीच्या विजयाचं वैशिष्ट्य ठरलं. टीम इंडियाच्या या अनुभवी बॅट्समननं स्पर्धेतील दुसरं अर्धशतक फक्त 31 बॉलमध्ये पूर्ण करत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. धवनलाच 'मॅन ऑफ द मॅच' चा पुरस्कार मिळाला.

  या मॅचमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाला आहे. दिल्लीच्या इनिंगमधील 18 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. तेंव्हा दिल्लीला विजयासाठी 18 बॉलमध्ये 16 रनची आवश्यकता होती. झाय रिचर्डसननं (Jhye Richardson) याने टाकलेला तो बॉल दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंतनं (Rishabh Pant) लाँग ऑनच्या दिशेनं टोलावला.

  पंजाबचा फिल्डर दीपक हुडा (Deepak Hooda) तो कॅच घेण्यासाठी धावत पुढे आला. त्याच्या हातातून एक किंवा दोनदा नाही तर चार वेळा बॉल निसटला.  ऋषभ पंत, पंजाबचे खेळाडू, सामना पाहणाऱ्या सर्वांच्याच हृदयांचे ठोके दरवेळी बॉल निसटल्यावर खाली-वर होत होते. पंजाबसाठी ऋषभ पंतची विकेट आवश्यक होती. तर दिल्लीसाठी तो मैदानात राहणं गरजेचं होतं. त्यामुळे दोन्ही टीम्सचे सर्व खेळाडू आणि फॅनचं हुडाच्या फिल्डिंगकडं लक्ष होतं. अखेर दीपक हुडानं तो कॅच पाचव्या प्रयत्नात घेतला.

  हा कॅच इतक्यावेळेला हातातून उडाल्यामुळे हुडाला हसू अनावर झालं आणि तो कॅच घेतल्यानंतर मैदानावर पडला तेव्हा हसत होता. कॉमेंट्रेटरनंही या कॅचबद्दल हसत हसतच प्रतिक्रिया दिली.

  अंपायरना हा कॅच नीट दिसला नव्हता त्यामुळे कॅच झाला की बॉल जमिनीला टेकला याबाबतचा निर्णय घेण्यासाठी त्यांनी थर्ड अंपायरची मदत घेतली. पण थर्ड अंपायरनेही कॅच योग्य असल्याचं सांगत ऋषभ पंतला आउट घोषित केलं. पंतनं 16 बॉलमध्ये एका सिक्ससह 15 रन्स केले. त्यानंतर मार्कस स्टॉयनिसने नाबाद 27 आणि ललित यादवने नाबाद 12 रन करत दिल्ली संघाला 19 ओव्हरमध्येच विजय मिळवून दिला.

  पंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार! 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा

  या विजयानंतर दिल्लीच्या टीमनं टीम पॉईंट टेबलवर दुसऱ्या स्थानी धडक मारली आहे, तर पंजाबची टीम सातव्या स्थानावर आहे.

  First published:
  top videos

   Tags: Cricket, Delhi capitals, IPL 2021, Punjab kings, Rishabh pant, Video viral