मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : 'तो मला धोकेबाज म्हणाला', CSK ला हरवल्यानंतर अश्विनचा मोठा खुलासा

IPL 2021 : 'तो मला धोकेबाज म्हणाला', CSK ला हरवल्यानंतर अश्विनचा मोठा खुलासा

भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर आर. अश्विन (R Ashwin) हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आयपीएल 2021 (IPL 2021)  मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR vs DC) कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि अश्विन यांच्यात वाद झाला.

  • Published by:  Shreyas

दुबई, 5 ऑक्टोबर : भारताचा दिग्गज ऑफ स्पिनर आर. अश्विन (R Ashwin) हा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. आयपीएल 2021 (IPL 2021)  मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR vs DC) कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि अश्विन यांच्यात वाद झाला. या वादाबाबत अश्विनने चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या (CSK) मॅचनंतर खुलासा केला आहे. ही वैयक्तिक लढाई नव्हती, तर खेळ कसा खेळला पाहिजे, याबाबतच्या दृष्टीकोनातला फरक होता, असं अश्विन म्हणाला. मागच्या आठवड्यात दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यातल्या मॅचदरम्यान ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) अंगाला थ्रो लागल्यानंतर अश्विन रन काढण्यासाठी पळाला. इयन मॉर्गनला हे पटलं नाही, म्हणून त्याने अश्विनसोबत वाद घातला. अश्विन खेळ भावनेच्या विपरित वागल्याचा आरोप त्याच्यावर झाला. आयसीसीच्या नियमानुसार मात्र शरिराला बॉल लागला तर रन काढण्याची परवानगी आहे.

इंग्लंडच्या टीमला अशाच घटनेचा फायदा मिळाला आणि त्यांनी 2019 वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात बेन स्टोक्सच्या शरिराला लागून बॉल बाऊंड्री लाईनबाहेर गेला, यानंतर अंपायरने ओव्हर थ्रोच्या रन दिल्या. या रनमुळे इंग्लंडला पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकता आला.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यानंतर अश्विन म्हणाला, 'हे वैयक्तिक भांडण नव्हतं. मी याला तसं पाहतही नाही. ज्यांना लक्ष वेधून घ्यायचं आहे, ते असं करू शकतात, पण मी याला असं पाहत नाही. ऋषभच्या हाताला बॉल लागला हे मला माहितीही नाही. पण ज्या शब्दांचा वापर केला गेला ते योग्य नव्हते.'

अश्विनची विकेट गेल्यानंतर टीम साऊदीने (Tim Southee) त्याच्यावर निशाणा साधला होता. जेव्हा तुम्ही धोकेबाजी करता तेव्हा असंच होतं, असं साऊदी अश्विनला म्हणाला. साऊदीच्या या वक्तव्यानंतर अश्विन संतापला आणि त्याच्या जवळ गेला, हे पाहून मॉर्गनही आला. अखेर दिनेश कार्तिकने मध्यस्ती करत वाद शांत केला. 'सांस्कृतिकरित्या सगळी लोकं वेगळी असतात. भारत आणि इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळणं शिकवलं जातं, पण विचार करायची पद्धत वेगळी असते. कोण चूक आहे, असं मी म्हणत नाही. 1940 साली जसं क्रिकेट खेळलं जायचं, तसंच आताही खेळलं जाईल, अशी अपेक्षा तुम्ही ठेवू शकत नाही,' असं वक्तव्य अश्विनने केलं.

First published:

Tags: Delhi capitals, IPL 2021, KKR, R ashwin