• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021: 'बाबा, लवकर घरी ये, तुझी आठवण येतेय', क्रिकेटपटूच्या मुलीने काढलं इमोशनल चित्र

IPL 2021: 'बाबा, लवकर घरी ये, तुझी आठवण येतेय', क्रिकेटपटूच्या मुलीने काढलं इमोशनल चित्र

खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारतात सुरू असलेली आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर क्रिकेटपटूच्या मुलीने इमोशनल असं चित्र काढलं आहे.

 • Share this:
  मुंबई, 4 मे: खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारतात सुरू असलेली आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सचे (KKR) दोन खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) आणि संदीप वॉरियर (Sandeep Warrior) यांना कोरोनाची लागण झाली, यानंतर चेन्नई सुपरकिंग्सचा (CSK) बॉलिंग प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी (Laxmipathi Balaji) आणि इतर दोन जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली, यानंतर मंगळवारी हैदराबादचा (SRH) ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) आणि दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) अमित मिश्रा (Amit Mishra) यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलं, त्यामुळे बीसीसीआयला (BCCI) हा निर्णय घ्यावा लागला. आयपीएल रद्द झाल्यानंतर सनरायजर्स हैदराबादचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने एक इमोशनल फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेयर केला आहे. डेव्हिड वॉर्नर याच्या मुलीने हे चित्र काढलं आहे. 'बाबा, लवकर घरी ये, तुझी आठवण येत आहे,' असं वॉर्नरच्या मुलीने या चित्रात लिहिलं आहे. डेव्हिड वॉर्नरला इव्ही, इंडी आणि इस्ला अशा तीन मुली आहेत.
  ऑस्ट्रेलियन खेळाडू घरी कसे जाणार? भारतातल्या वाढत्या कोरोनाच्या संक्रमणामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने भारतासोबतची विमानसेवा 15 मे बंद केली आहे, त्यामुळे खेळाडू ऑस्ट्रेलियात कसे परतणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे एन्ड्रयू टाय आणि एडम झम्पा यांनी सुरुवातीलाच स्पर्धा सोडून घरी परतण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन सरकारकडून निर्बंध जाहीर होण्याआधीच हे दोघंही ऑस्ट्रेलियाला पोहोचले, पण आयपीएलमध्ये कॉमेंट्री करायला आलेला मायकल स्लेटर आता मालदीवमध्ये अडकला आहे. डेव्हिड वॉर्नरला धक्का आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सनरायजर्स हैदराबादची कामगिरी खराब झाली, त्यांना 7 पैकी फक्त एक मॅच जिंकता आली, यानंतर टीम प्रशासनाने वॉर्नरला कर्णधारपदावरून हटवलं, एवढंच नाही तर त्याला टीममधूनही डच्चू देण्यात आला. या प्रकारानंतर डेव्हिड वॉर्नर धक्क्यात होता, तसंच त्याचा बाऊंड्री लाईनबाहेर बसून रडतानाचा एक फोटोही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. वॉर्नरच्याऐवजी केन विलियमसन याला हैदराबादचं नेतृत्व देण्यात आलं.
  Published by:Shreyas
  First published: