मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021 : SRH च्या टीममध्ये अपमान, दुखावलेल्या डेव्हिड वॉर्नरची इमोशनल पोस्ट

IPL 2021 : SRH च्या टीममध्ये अपमान, दुखावलेल्या डेव्हिड वॉर्नरची इमोशनल पोस्ट

सनरायजर्स हैदराबादकडून (SRH) खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने आयपीएलमधून (IPL 2021) माघार घेतली आहे. तसंच भविष्यात हैदराबादकडून कधीच खेळणार नसल्याचे संकेतही वॉर्नरने दिले.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 1 ऑक्टोबर : सनरायजर्स हैदराबादकडून (SRH) खेळणाऱ्या डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने आयपीएलमधून (IPL 2021) माघार घेतली आहे. तसंच भविष्यात हैदराबादकडून कधीच खेळणार नसल्याचे संकेतही वॉर्नरने दिले. खराब फॉर्ममध्ये असलेल्या डेव्हिड वॉर्नरला हैदराबादने अंतिम-11 मध्ये खेळण्याची संधी दिली नाही. आयपीएलच्या पहिल्या राऊंडवेळी वॉर्नरला अचानक कॅप्टन्सीवरून काढून टाकण्यात आलं आणि केन विलियमसनला (Kane Williamson) टीमचं नेतृत्व देण्यात आलं. यानंतर दुसऱ्या राऊंडवेळीही वॉर्नरचा टीममध्ये अपमान केल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं.

डेव्हिड वॉर्नरच्याच नेतृत्वात हैदराबादची टीम आयपीएल चॅम्पियन बनली होती, पण आता याच वॉर्नरला टीममध्ये स्थान मिळत नाही. या सगळ्या वादानंतर दुखावलेल्या वॉर्नरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेयर केली. यातून वॉर्नरने आपलं दु:ख व्यक्त केल्याचं त्याचे चाहते म्हणत आहेत. चेन्नईविरुद्धच्या (CSK vs SRH) सामन्यात वॉर्नर डगआऊटमध्येही आला नाही. आपल्या हॉटेल रूममधून वॉर्नरने टीव्हीवर सामना बघितला.

'तुमच्या चेहऱ्यासमोर कोण खरं आहे हे महत्त्वाचं नाही. तर तुमच्या मागे कोणं खरं राहतं हे महत्त्वाचं आहे,' असं वॉर्नर त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये म्हणाला आहे. याचसोबत त्याने एक व्हिडिओही शेयर केला, ज्यात तो टीव्हीसमोर बसून हैदराबादच्या टीमला चीयर करत आहे. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा 6 विकेटने पराभव झाला. प्ले-ऑफच्या शर्यतीतून हैदराबाद आधीच बाहेर झाली आहे.

david warner instagram

वॉर्नरचा अपमान?

दरम्यान, हैदराबाद व्यवस्थापनाकडून डेव्हिड वॉर्नरला वाईट वागणूक मिळत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबरला खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान, वॉर्नर हॉटेलमध्येच थांबला होता. शारजाह येथे खेळण्यात आलेल्या सामन्यासाठी वॉर्नरला टीमसोबत बस प्रवास करण्यास परवानगी दिलेली नाही.

वॉर्नरने आयपीएलच्या या मोसमात 8 मॅचमध्ये 195 रन केले, यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये वॉर्नरच्या नावावर 5,449 रन आहेत, तसंच त्याने 4 शतकंही केली आहेत. या मोसमात मात्र त्याची कामगिरी निराशाजनक झाली, त्यामुळेच त्याला कॅप्टन्सीवरूनही हटवण्यात आलं.

First published:

Tags: David warner, IPL 2021, SRH