मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: डेल स्टेनच्या त्या वादग्रस्त विधानावर अजिंक्य रहाणेनं दिलं सडेतोड उत्तर

IPL 2021: डेल स्टेनच्या त्या वादग्रस्त विधानावर अजिंक्य रहाणेनं दिलं सडेतोड उत्तर

IPL 2021: डेल स्टेन म्हणाला होता, 'आयपीएलमध्ये क्रिकेटपेक्षा पैशांना जास्त महत्त्व दिलं जातं.' त्याने पाकिस्तानच्या सुपर लीगचं कौतुक केलं होतं.

IPL 2021: डेल स्टेन म्हणाला होता, 'आयपीएलमध्ये क्रिकेटपेक्षा पैशांना जास्त महत्त्व दिलं जातं.' त्याने पाकिस्तानच्या सुपर लीगचं कौतुक केलं होतं.

IPL 2021: डेल स्टेन म्हणाला होता, 'आयपीएलमध्ये क्रिकेटपेक्षा पैशांना जास्त महत्त्व दिलं जातं.' त्याने पाकिस्तानच्या सुपर लीगचं कौतुक केलं होतं.

नवी दिल्ली, 4 मार्च : दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) जलदगती गोलंदाज डेल स्टेन (Dale Steyn) याने आयपीएलशी (IPL 2021) संबंधित एक असं वक्तव्य केलं, ज्यावरून वाद उपस्थित झाला आहे. आता या वादावर भारताचा आघाडीचा फलंदाज अजिंक्य रहाणेने सडेतोड उत्तर दिलं आहे.

डेल स्टेनने म्हटलं होतं, की आयपीएलमध्ये क्रिकेटपेक्षा जास्त महत्त्व पैशांना दिलं जातं. त्यावर भारताचा फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने जशास तसं उत्तर दिलं आहे. याबद्दलची बातमी 'झी न्यूज'ने दिली आहे.

व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्समध्ये अजिंक्य रहाणेला जेव्हा डेल स्टेनच्या वक्तव्याबद्दल विचारलं गेलं, तेव्हा तो म्हणाला, की ' हे बघा, मी इथे चौथ्या कसोटी सामन्याशी संबंधित विषयावर बोलण्यासाठी आलो आहे. बाकी कोणत्या विषयावर बोलण्यासाठी नाही. आयपीएलने आम्हा सगळ्यांना असं एक व्यासपीठ दिलं आहे, की ज्यामुळे भारतीय क्रिकेटर्सना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली आहे. डेल स्टेनचं यावर काय म्हणणं आहे, ते मला माहिती नाही.'

दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनने पाकिस्तान सुपर लीग (PSL) ही इंडियन प्रीमिअर लीगपेक्षा चांगली असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर फॅन्स संतप्त झाले होते. 'आयपीएल व्यतिरिक्त अन्य लीगमध्ये खेळणं खेळाडू म्हणून अधिक काही तरी देणारं असतं. आयपीएलमध्ये सगळ्यात जास्त लक्ष यावर दिलं जातं की कोणता खेळाडू किती पैसे कमावत आहे ' असं त्याने म्हटलं होतं.

डेल स्टेन म्हणाला होता, 'आयपीएलमध्ये क्रिकेटपेक्षा पैशांना जास्त महत्त्व दिलं जातं. खेळाडू पैशाला जास्त महत्त्व देऊ लागतात. पण पीएसएलमध्ये क्रिकेटला जास्त महत्त्व दिलं जातं.'

 हे  वाचा -   IPL 2021च्या तयारीसाठी पोहोचला माही; चेन्नईत काय करतोय पाहा PHOTO

डेल स्टेनच्या या वक्तव्यानंतर ट्विटरवर अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या.

स्टेनने जानेवारीमध्ये सांगितलं होतं,की आयपीएल2021मध्ये तो सहभागी होणार नाही मात्र जगभरातल्या अन्य ठिकाणच्या लीगमध्ये मात्र तो सहभागी होईल.

दक्षिणआफ्रिकेच्या या गोलंदाजाने आयपीएलच्या 95 मॅचेसमध्ये 97 बळी घेतले आहेत.आठ धावा देऊन तीन बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या काही वर्षांत दुखापतीने त्रस्त असल्यामुळे डेल स्टेन गेल्या तीन सत्रांत आयपीएलच्या केवळ 12 मॅचेसच खेळू शकला आहे.

First published:

Tags: Ajinkya rahane, Cricket, IPL 2021