Home /News /sport /

IPL 2021 : भारतीय खेळाडू म्हणाला तूच माझा आयडल, LIVE कार्यक्रमात रडला डेल स्टेन

IPL 2021 : भारतीय खेळाडू म्हणाला तूच माझा आयडल, LIVE कार्यक्रमात रडला डेल स्टेन

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फास्ट बॉलर डेल स्टेन (Dale Steyn) याला लाईव्ह कार्यक्रमात अश्रू अनावर झाले. डेल स्टेन आपला आयडल असल्याचं भारताचा फास्ट बॉलर शिवम मावी (Shivam Mavi) म्हणाला, यानंतर स्टेन भावनिक झाला.

    मुंबई, 27 एप्रिल : दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फास्ट बॉलर डेल स्टेन (Dale Steyn) याला लाईव्ह कार्यक्रमात अश्रू अनावर झाले. डेल स्टेन आपला आयडल असल्याचं भारताचा फास्ट बॉलर शिवम मावी (Shivam Mavi) म्हणाला, यानंतर स्टेन भावनिक झाला. आयपीएलच्या (IPL 2021) सामन्यांचं विश्लेषण करण्यासाठी स्टेन इएसपीएन क्रिकइन्फोच्या कार्यक्रमात आला होता. या कार्यक्रमात स्टेनसोबतच आकाश चोप्राही (Aakash Chopra) होता. शो सुरू असताना केकेआरचा फास्ट बॉलर शिवम मावी स्टेनला आपला आयडल म्हणाला, यानंतर स्टेन भावुक झाला. 'जेव्हापासून मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली, तेव्हापासूनच मी स्टेनला फॉलो करायचो. आऊट स्विंग कसा करायचा, हे शिकण्यासाठी मी स्टेनची बॉलिंग बघायचो. बुमराह (Jasprit Bumrah) आणि भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) यांच्या रणनितीही मी फॉलो करतो, पण डेल स्टेन माझा आयडल आहे,' असं मावी या कार्यक्रमात म्हणाला. शिवम मावीची ही प्रतिक्रिया ऐकून स्टेन भावनिक झाला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. जगाच्या वेगळ्या कोपऱ्यात राहणाऱ्या व्यक्तीवर आपण एवढा प्रभाव टाकू शकतो, असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता, असं स्टेन या कार्यक्रमात म्हणाला. तसंच शिवम मावीने अशीच कामगिरी केली तर तो एक दिवस नक्की भारतासाठी खेळेल, असा विश्वासही स्टेनने व्यक्त केला, तसंच त्याच्यासोबत बोलायला मला नक्कीच आवडेल, असं स्टेनने सांगितलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, IPL 2021

    पुढील बातम्या