मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, CSK vs RR : चेन्नईचे बॉलर चमकले, राजस्थानवर दणदणीत विजय

IPL 2021, CSK vs RR : चेन्नईचे बॉलर चमकले, राजस्थानवर दणदणीत विजय

चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सला (CSK vs Rajasthan Royals) विजयासाठी 189 रनचं आव्हान दिलं आहे. मुख्य म्हणजे एवढी मोठी धावसंख्या करुनही चेन्नईच्या एकाही बॅट्समनने अर्धशतक केलं नाही.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्सची (CSK) धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यात धोनीच्या (MS Dhoni) टीमने 45 रननी दणदणीत विजय मिळवला आहे. चेन्नईने ठेवलेल्या 189 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 143 रनपर्यंतच मजल मारता आली. जॉस बटलरने (Jos Buttler) 35 बॉलमध्ये सर्वाधिक 49 रन केले, पण बटलरशिवाय राजस्थानच्या कोणत्याही बॅट्समनला मोठा स्कोअर करता आला नाही. चेन्नईकडून मोईन अलीने (Moeen Ali) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर सॅम करन आणि रविंद्र जडेजाला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. शार्दूल ठाकूर आणि ड्वॅन ब्राव्होला एक विकेट घेण्यात यश आलं.

चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सला (CSK vs Rajasthan Royals) विजयासाठी 189 रनचं आव्हान दिलं. मुख्य म्हणजे एवढी मोठी धावसंख्या करुनही चेन्नईच्या एकाही बॅट्समनने अर्धशतक केलं नाही. फाफ डुप्लेसिस (Faf Duplesis) हा त्यांचा सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू होता, त्याने 17 बॉलमध्ये 33 रनची खेळी केली. तर मोईन अलीने (Moeen Ali) 26, अंबाती रायुडूने (Ambati Rayudu) 27 रन केले. ड्वॅन ब्राव्हो (Dwyane Bravo) 20 रनवर नाबाद राहिला. राजस्थानकडून चेतन सकारियाने (Chetan Sakariya) सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर क्रिस मॉरिसला (Chris Morris) 2 विकेट मिळाल्या. मुस्तफिजूर (Mustafizur) आणि राहुल तेवतियाला (Rahul Tewatia) प्रत्येकी 1-1 विकेट घेण्यात यश आलं.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. राजस्थान आणि चेन्नईने (CSK) त्यांच्या टीममध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. चेन्नईचा यंदाच्या मोसमातला हा दुसरा विजय आहे. धोनीच्या टीमने तीनपैकी दोन सामने जिंकले, तर एका सामन्यात त्यांचा पराभव झाला. दुसरीकडे राजस्थानला तीनपैकी एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, Rajasthan Royals, Sanju samson