मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021, CSK vs SRH : चेन्नईचा लागोपाठ पाचवा विजय, हैदराबादची हाराकिरी सुरूच

IPL 2021, CSK vs SRH : चेन्नईचा लागोपाठ पाचवा विजय, हैदराबादची हाराकिरी सुरूच

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) लागोपाठ पाचवा विजय नोंदवला आहे. फाफ डुप्लेसिस (Faf du Plessis) आणि ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने हैदराबादने (CSK vs SRH) दिलेलं 171 रनचं आव्हान अगदी सहज पूर्ण केलं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

नवी दिल्ली, 28 एप्रिल : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात (IPL 2021) चेन्नई सुपरकिंग्सने (Chennai Super Kings) लागोपाठ पाचवा विजय नोंदवला आहे. फाफ डुप्लेसिस (Faf du Plessis) आणि ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) अर्धशतकी खेळींमुळे चेन्नईने हैदराबादने (CSK vs SRH) दिलेलं 171 रनचं आव्हान अगदी सहज पूर्ण केलं. ऋतुराज गायकवाडने 44 बॉलमध्ये 75 रन आणि फाफ डुप्लेसिसने 38 बॉलमध्ये 56 रनची खेळी केली. हैदराबादकडून फक्त राशिद खान याला 3 विकेट मिळाल्या, इतर सगळे बॉलर्स अपयशी ठरले.

डेव्हिड वॉर्नर (David Warner) आणि मनिष पांडे (Manish Pandey) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर हैदराबादने चेन्नईला (CSK vs SRH) विजयासाठी 172 रनचं आव्हान दिलं. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर हैदराबादची सुरुवात खराब झाली. जॉनी बेयरस्टो (Jonny Bairstow) स्वस्तात आऊट झाला, पण वॉर्नर आणि मनिष पांडेच्या (Manish Pandey) जोडीने डाव सावरला. वॉर्नरने 55 बॉलमध्ये 57 आणि मनिष पांडेने 46 बॉलमध्ये 61 रनची खेळी केली. केन विलियमसन (Kane Williamson) 10 बॉलमध्ये 26 रनवर आणि केदार जाधव (Kedar Jadhav) 4 बॉलमध्ये 12 रनवर नाबाद राहिले.

आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये केदार जाधव अपयशी ठरल्यामुळे त्याला टीमबाहेर बसवण्यात आलं होतं, तर आयपीएल लिलावाआधी चेन्नईने केदार जाधवला रिलीज केलं होतं, त्यामुळे मनिष पांडे आणि केदार जाधव यांनी त्यांच्या या कामगिरीतून बदला घेतला. चेन्नईकडून लुंगी एनगिडीला (Lungi Ngidi) सर्वाधिक 2 विकेट मिळाल्या, तर सॅम करनने (Sam Curran) एक विकेट घेतली.

या सामन्यामध्ये सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) टीममध्ये दोन बदल केले आहेत. ड्वॅन ब्राव्हो (Dwyane Bravo) आणि इम्रान ताहीर (Imran Tahir) यांच्याऐवजी लुंगी एनगिडी (Lungi Ngidi) आणि मोईन अलीला (Moeen Ali) संधी देण्यात आली आहे. तर हैदराबादनेही टीममध्ये दोन बदल केले. संदीप शर्मा (Sandeep Sharma) आणि मनिष पांडे (Manish Pandey) यांचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे.

या विजयासह चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. चेन्नईने आतापर्यंत 6 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले असून एकात त्यांचा पराभव झाला, तर दुसरीकडे हैदराबादची टीम पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे. हैदराबादने 6 पैकी फक्त एक सामना जिंकला असून 5 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

First published:

Tags: Cricket, Csk, David warner, IPL 2021, MS Dhoni, SRH