Home /News /sport /

IPL इतिहासातला सगळ्यात खराब बॉल, बॅट्समननेही करून घेतलं हसं, मैदानातल्या कॉमेडीचा VIDEO

IPL इतिहासातला सगळ्यात खराब बॉल, बॅट्समननेही करून घेतलं हसं, मैदानातल्या कॉमेडीचा VIDEO

आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स (CSK vs RR) यांच्यात अबु धाबीमध्ये महत्त्वाचा सामना खेळवला गेला.

    अबु धाबी, 3 ऑक्टोबर : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स (CSK vs RR) यांच्यात अबु धाबीमध्ये महत्त्वाचा सामना खेळवला गेला. या सामन्यात राजस्थानचा 7 विकेटने विजय झाला. चेन्नईने पहिले बॅटिंग करत 4 विकेट गमावून 189 रन केले. या आव्हानाचा पाठलाग राजस्थानने 17.3 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून केला. राजस्थानच्या बॅट्समननी चेन्नईचा डावखुरा फास्ट बॉलर सॅम करनची (Sam Curran) धुलाई केली. करनने 4 ओव्हरमध्ये 13 रन पेक्षा जास्तच्या इकोनॉमी रेटने 55 रन दिल्या. करनला या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. या मॅचमध्ये त्याने अत्यंत खराब बॉल टाकला, त्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. वादळी खेळीनंतर यशस्वी CSK च्या ड्रेसिंग रूममध्ये, धोनीने दिलं आयुष्यभर लक्षात राहणारं गिफ्ट! राजस्थानची टीम विजयाच्या दिशेने चालली असताना 17 व्या ओव्हरमध्ये करन बॉलिंगला आला. ओव्हरचा दुसरा बॉल खेळपट्टीवर पडण्याऐवजी थेट शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने गेला. बॅटिंग करत असलेला ग्लेन फिलिप्सही (Glenn Phillips) हा बॉल मारण्यासाठी शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने गेला. हे करण्यात फिलिप्सला यश आलं नाही. करनने टाकलेला हा बॉल अखेर धोनीने (MS Dhoni) जाऊन अडवला. सॅम करनच्या या बॉलला अंपायरने नो बॉल दिला, ज्यामुळे राजस्थानला फ्री हिट मिळाला. फिलिप्सने या फ्री हिटचा पुरेपुर फायदा उचलला आणि फोर मारली. करनच्या या ओव्हरमध्ये फिलिप्सने सिक्सही मारली. पुढच्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर एक रन काढून फिलिप्सने राजस्थानला विजय मिळवून दिला. 8 बॉलमध्ये 14 रनवर तो नाबाद राहिला. या विजयासोबत राजस्थानचं प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याचं आव्हान अजून कायम आहे. राजस्थानचे लीग स्टेजमधले अजून 2 सामने बाकी आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांचा विजय झाला तर त्यांच्याकडे प्ले-ऑफला पोहोचण्याची संधी आहे. IPL 2021: सचिनच्या मंत्रामुळे 'यशस्वी' झालो, भारताच्या नव्या स्टारनं दिलं मास्टर ब्लास्टरला श्रेय
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, Rajasthan Royals

    पुढील बातम्या