Home /News /sport /

IPL 2021 : धोनीची उडी बघून चाहते म्हणाले, 21 महिने उशीर झाला!

IPL 2021 : धोनीची उडी बघून चाहते म्हणाले, 21 महिने उशीर झाला!

एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सचा (CSK vs Rajasthan Royals) 45 रनने पराभव केला. या सामन्यात रन आऊट होण्यापासून वाचण्यासाठी धोनीने मारलेल्या उडीची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

    मुंबई, 20 एप्रिल : एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्सचा (CSK vs Rajasthan Royals) 45 रनने पराभव केला. यानंतर धोनीने त्याच्या फिटनेसवरही चर्चा केली. जेव्हा तुम्ही खेळत असता, तेव्हा कोणीही तुम्हाला अनफिट म्हणलेलं आवडणार नाही. प्रत्येकाला युवा खेळाडूची बरोबरी करायची असते. ते खूप पळतात, पण हे आव्हानात्मक असते, अशी प्रतिक्रिया धोनीने दिली. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात धोनीने रन आऊट होण्यापासून वाचण्यासाठी उडी मारली आणि तो क्रीजमध्ये आला. यानंतर चाहत्यांनी त्याला 2019 वर्ल्ड कपची आठवण करून दिली. आयपीएलच्या या मोसमात राजस्थान आणि चेन्नईमध्ये 12वी मॅच खेळवण्यात आली. या मॅचमध्ये धोनी बॅटिंगला उतरला तेव्हा चेन्नईचा स्कोअर 125/5 एवढा झाला होता. धोनीसोबत जडेजा बॅटिंग करत होता. 15 व्या ओव्हरमध्ये राहुल तेवतियाच्या दुसऱ्या बॉलवर धोनीने कव्हर्सच्या दिशेने शॉट मारला आणि एक रन करण्यासाठी तो धावला, पण जडेजाने (Ravindra Jadeja) त्याला परत पाठवलं. या गोंधळामध्ये धोनी रन आऊट झाला असता, पण उडी मारून त्याने स्वत:ची विकेट वाचवली. मैदानामध्ये रन काढण्यासाठी धावत असताना धोनीला खूप कमी वेळा अशी उडी मारताना चाहत्यांनी बघितलं आहे. त्यामुळे धोनीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. चाहत्यांनी धोनीला 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलची आठवण करून दिली. न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सामन्यात धोनी रन आऊट झाला होता, त्यावेळी धोनीने उडी मारली नव्हती, त्यामुळे अनेकांनी उडी मारायला 21 महिने उशीर झाला, अशी प्रतिक्रिया दिली. चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार म्हणून धोनीचा हा 200 वा सामना होता. टी-20 क्रिकेटमध्ये एकाच टीमचं एवढ्या मॅच नेतृत्व करणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे. या सामन्यात धोनीने 17 बॉलमध्ये 18 रनची खेळी केली. चेन्नईने या सामन्यात राजस्थानला विजयासाठी 189 रनचं आव्हान दिलं, पण त्यांना हे आव्हान गाठता आलं नाही.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni

    पुढील बातम्या