• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IPL 2021 : सर जडेजाने कुटले 37 रन, मॅचचा हिरो एकाच ओव्हरमध्ये झिरो

IPL 2021 : सर जडेजाने कुटले 37 रन, मॅचचा हिरो एकाच ओव्हरमध्ये झिरो

आयपीएलमध्ये (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या (RCB vs CSK) सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) नवा विक्रम केला आहे. हर्षल पटेलच्या (Harshal Patel) शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजाने तब्बल 37 रन काढले.

 • Share this:
  मुंबई, 25 एप्रिल : आयपीएलमध्ये (IPL 2021) रॉयल चॅलेंजर्स बँगलोरविरुद्धच्या (RCB vs CSK) सामन्यात रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) नवा विक्रम केला आहे. हर्षल पटेलच्या (Harshal Patel) शेवटच्या ओव्हरमध्ये जडेजाने तब्बल 37 रन काढले. 19 ओव्हर संपल्यानंतर चेन्नईचा स्कोअर 154/4 एवढा होता. यानंतर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने हर्षल पटेलच्या हातात बॉल दिला. जडेजाने हर्षल पटेलच्या ओव्हरमध्ये लागोपाठ 4 सिक्स मारल्या. पटेलने टाकलेला तिसरा बॉल नो बॉल असल्यामुळे जडेजाला फ्री हिट मिळाला, या फ्री हिटचाही त्याने फायदा घेतला. यानंतर चौथ्या बॉलवर जडेजाने 2 रन काढल्यानंतर पाचव्या बॉलला परत सिक्स मारली आणि सहाव्या बॉलला फोर मारून एकाच ओव्हरमध्ये 37 रनच्या विक्रमाची बरोबरी केली. जडेजाच्या या खेळीमुळे चेन्नई सुपरकिंग्सने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 191 रन केले. जडेजाने 28 बॉलमध्ये 221.43 च्या स्ट्राईक रेटने 62 रन केले. चौथ्या ओव्हरआधी हर्षल पटेलने 3 ओव्हरमध्ये फक्त 14 रन देऊन 3 विकेट घेतल्या, पण शेवटच्या ओव्हरनंतर हर्षल पटेलची आकडेवारी 4 ओव्हरमध्ये 51 रन देऊन 3 विकेट अशी झाली. त्यामुळे शेवटच्या ओव्हरआधी मॅचचा हिरो असलेला हर्षल पटेल एकाच ओव्हरमध्ये झिरो झाला.
  Published by:Shreyas
  First published: