मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021: CSK ची जर्सी घालण्यासाठी एका नवऱ्याची तळमळ; फोटो होतोय व्हायरल

IPL 2021: CSK ची जर्सी घालण्यासाठी एका नवऱ्याची तळमळ; फोटो होतोय व्हायरल

चेन्नई सुपर किंग्जचा चाहता म्हणतोय, 'माझी पत्नी मला चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घालू देत नाही.'

चेन्नई सुपर किंग्जचा चाहता म्हणतोय, 'माझी पत्नी मला चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घालू देत नाही.'

IPL 2021: चेन्नई सुपर किंग्ज (CSK)आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सामन्यातही एका चाहत्याने लक्ष वेधून घेतले. हा चाहता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : सध्या क्रिकेट जगतात आयपीएलचा(IPL) फिव्हर सर्वत्र पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या १४व्या हंगामाच्या यूएई स्टेजमध्ये चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे प्रेक्षक स्टेडियममध्ये त्यांच्या आवडत्या संघांना आणि आवडत्या खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसत आहेत. काही वेळेस हेच प्रेक्षक आपल्या विविध कृतीमुळे लक्ष वेधून घेतात. चेन्नई सुपर किंग्ज (CSK)आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यातील सामन्यातही एका चाहत्याने लक्ष वेधून घेतले. हा चाहता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

तीन वेळा चॅम्पियन बनलेल्या चेन्नई सुपर किंग्ज  (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB)  हे दोन्ही संघ शुक्रवारी (24 सप्टेंबर) आमने-सामने आले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने हा सामना 11 चेंडू आणि 4 गडी राखून जिंकला.

हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येत प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित होते, दरम्यान आयपीएलच्या एका चाहत्याने (CSK FAN)सर्वांचे लक्ष वेधले. त्याने नाईलाज म्हणून बंगळुरू संघाची जर्सी घातली असल्याचे अप्रत्यक्षपणे फलक दर्शवत सांगितले आहे.

चाहता CSK पण....नाईलाज....

बंगळुरू संघाची जर्सी घातलेल्या या व्यक्तीच्या हातात एक फलक होते. त्या फलकावर लिहिले होते की, 'माझी पत्नी मला चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घालू देत नाही.' यावरून हे स्पष्ट होते की, तो व्यक्ती चेन्नई सुपर किंग्जचा चाहता आहे, पण त्याची पत्नी विराट कोहलीच्या आरसीबीची फॅन आहे. त्यामुळे त्याला नाईलाजाने आरसीबीची जर्सी घालावी लागत आहे.

या चाहत्याचा फोटो चेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. चेन्नई सुपर किंग्जने या फोटोला ‘प्रेम आंधळे असते’ अशी कॅप्शन दली आहे. लाल आणि पिवळ्या हृदयाच्या इमोजीदेखील कॅप्शनमध्ये दिसत आहे.

सध्या हा फोटो तुफान व्हायरल झाला असून या फोटोला १७ हजारांहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. तसेच, नेटकऱ्यांनी गंमतशीर कमेंट्सदेखील नोंदवल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलं आहे की, 'गोंडस', तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की, 'तिला घटस्फोट द्या.' असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

प्लेऑफमध्ये जाण्यासाठी 4 टीम्स एकमेकांना भिडणार; IPL मधील चुरस वाढली

2020 च्या पर्वात वाईट कामगिरी करणारा चेन्नईचा संघ यंदा मात्र प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ ठरण्याची शक्यता आहे. चेन्नईचा प्लेऑफमधील प्रवेश जवळजवळ निश्चित झाला असून ८ विजय मिळवून 16 गुणांसहीत चेन्नई अव्वल स्थानी आहे. आता चेन्नई उर्वरित सर्व सामन्यांमध्ये पराभूत झाला तरी चौथ्या स्थानावर राहणारा संघ ठरणार आहे. त्यामुळे त्याचे प्लेऑफचं तिकीट जवळपास निश्चित झाले आहे.

First published:
top videos

    Tags: Csk, IPL 2021, RCB