IPL 2021 : पहिले रन आऊट मग कॅच, सुपरमॅन जडेजाची अफलातून फिल्डिंग, पाहा VIDEO

IPL 2021 : पहिले रन आऊट मग कॅच, सुपरमॅन जडेजाची अफलातून फिल्डिंग, पाहा VIDEO

टीम इंडियाच नाहीतर जगातल्या सर्वोत्तम फिल्डरपैकी एक असलेल्या रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) पुन्हा एकदा मैदानात अफलातून फिल्डिंगचा नजराणा पेश केला आहे. आयपीएलच्या चेन्नई सुपरकिंग्स आणि पंजाब किंग्स (CSK vs Punjab Kings) यांच्या सामन्यात जडेजाने केएल राहुलला (KL Rahul) रन आऊट केलं, तर क्रिस गेलचा (Chris Gayle) भन्नाट कॅच पकडला.

  • Share this:

मुंबई, 16 एप्रिल : टीम इंडियाच नाहीतर जगातल्या सर्वोत्तम फिल्डरपैकी एक असलेल्या रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) पुन्हा एकदा मैदानात अफलातून फिल्डिंगचा नजराणा पेश केला आहे. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्स आणि पंजाब किंग्स (CSK vs Punjab Kings) यांच्यातल्या मॅचमध्ये जडेजाने आपली गणना सर्वोत्तम फिल्डर्समध्ये का होते, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर जडेजाने केएल राहुलला (KL Rahul) रन आऊट केलं. गेलने ऑफ साईडला बॉल मारला यानंतर तो आणि राहुल रन काढण्यासाठी पळाले, पण चपळ जडेजाने डायरेक्ट हिट करत राहुलला घरी पाठवलं.

तिसऱ्या ओव्हरमध्ये राहुलची विकेट गेल्यानंतर पाचव्या ओव्हरमध्ये जडेजाने दीपक चहरच्या बॉलिंगवर पॉईंटला क्रिस गेलचा (Chris Gayle) अफलातून कॅच पकडला. रविंद्र जडेजाच्या या फिल्डिंगमुळे पंजाब किंग्सचे हुकमी एक्के असलेले केएल राहुल आणि क्रिस गेल माघारी परतले.

रविंद्र जडेजासोबतच दीपक चहरनेही पंजाब किंग्सच्या बॅटिंगला खिंडार पाडलं. 4 ओव्हरमध्ये 13 रन देऊन चहरने पंजाबच्या 4 विकेट घेतल्या. मयंक अग्रवाल, क्रिस गेल, दीपक हुडा आणि निकोलस पूरन या पंजाबच्या महत्त्वाच्या बॅट्समनना माघारी पाठवलं.

दीपक चहरच्या या बॉलिंगमुळे चेन्नईने पंजाबला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 106 रनवर रोखलं. शाहरुख खानने 36 बॉलमध्ये 4 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 47 रन केले. सॅम करन, मोईन अली आणि ड्वॅन ब्राव्हो यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.

Published by: Shreyas
First published: April 16, 2021, 9:25 PM IST

ताज्या बातम्या