Home /News /sport /

IPL 2021 : दिल्ली-चेन्नईच्या सामन्यात आपण फक्त स्टम्प माईकचा आवाज ऐकायचा!

IPL 2021 : दिल्ली-चेन्नईच्या सामन्यात आपण फक्त स्टम्प माईकचा आवाज ऐकायचा!

आयपीएलच्या 14 व्या मोसमाला (IPL 2021) सुरूवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs Delhi Capitals) यांच्यात सामना रंगेल. दिल्लीचं नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्याकडे तर तीन वेळची चॅम्पियन चेन्नईची जबाबदारी एमएस धोनीकडे (MS Dhoni) असेल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 10 एप्रिल : आयपीएलच्या 14 व्या मोसमाला (IPL 2021) सुरूवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स (CSK vs Delhi Capitals) यांच्यात सामना रंगेल. दिल्लीचं नेतृत्व ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्याकडे तर तीन वेळची चॅम्पियन चेन्नईची जबाबदारी एमएस धोनीकडे (MS Dhoni) असेल. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणारा हा सामना गुरू विरुद्ध चेला असल्याचंही बोललं जात आहे. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनीही हा सामना बघण्यासाठी आपण उत्साही असल्याचं सांगितलं. रवी शास्त्री यांनी पंत आणि धोनीचा एक फोटो ट्वीट केला. गुरू विरुद्ध चेला. खूप मजा येईल. स्टम्प माईकचा आवाज नक्की ऐका, असं कॅप्शन रवी शास्त्री यांनी या फोटोला दिलं आहे. याआधी रवी शास्त्री यांनी फॅनकोडशी धोनी आणि ऋषभ पंत यांच्याबाबत चर्चा केली. 'ऋषभ पंत धोनीला त्याचा आयडल मानतो. मागच्या 6 महिन्यात पंतमध्ये खूप बदल घडला आहे. मीदेखील हा सामना बघण्यासाठी उत्सूक आहे. कारण चेन्नईकडे बराच अनुभव आहे, तसंच त्यांनी नव्या खेळाडूंनाही टीममध्ये घेतलं आहे, तर दुसरीकडे दिल्लीची टीम मजबूत आहे,' असं रवी शास्त्री म्हणाले. आयपीएलच्या मागच्या मोसमात फायनल गाठणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. टीमचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्या खांद्याला दुखापत झाली, त्यामुळे तो आयपीएल खेळू शकणार नाही. अय्यरच्याऐवजी ऋषभ पंतला नेतृत्व देण्यात आलं. टीममध्ये शिखर धवन, आर.अश्विन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यासारखे अनुभवी खेळाडू असतानाही दिल्लीने पंतला कर्णधार करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ पंत आणि एमएस धोनी विकेट कीपिंग करत असताना नेहमीच काहीतरी बोलत असतात. स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालेलं या दोघांचं बोलणं नेहमीच व्हायरल होतं. 'पंत कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी कशी सांभाळतो हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. तो एक शानदार बॅट्समन आहे, आता नेतृत्वाच्या जबाबदारीमध्ये तो स्वत:ला कसं ऍडजस्ट करतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे,' असं वक्तव्य शास्त्रींनी केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Csk, Delhi capitals, IPL 2021, MS Dhoni, Ravi shastri, Rishabh pant

    पुढील बातम्या